काय घडलं नेमकं?
पीडित मुलीची तिच्याच शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींशी मैत्री झाली होती. या बहिणी तिला वारंवार आपल्या घरी बोलावून घेत असत. याच दरम्यान त्यांनी आपला भाऊ साहिल याच्याशी पीडितेची ओळख करून दिली आणि त्यांच्यात संवाद वाढवला. एके दिवशी या दोघी बहिणींनी पीडितेला घरी बोलावून तिला खोलीत एकटे सोडून बाहेरून कडी लावून घेतली. याच संधीचा फायदा घेत साहिलने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले आणि कोणाला सांगितल्यास बदनाम करण्याची धमकी दिली.
Fire News: नोएडामधील फॅक्टरीला भीषण आग; श्वास गुदमरला अन्…; तब्बल 250 कर्मचाऱ्यांसोबत घडले काय?
कसा आला प्रकरण समोर
या धमकीला घाबरून पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही, ज्याचा फायदा घेत आरोपी साहिल गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णलयात नेले असता,ती गर्भवती असल्याचे समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपी साहिल आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन बहिणींविरुद्ध तक्रार दाखल केली. रौन पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, फरार झालेल्या मुख्य आरोपी साहिलच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनीही घेतली धाव
या प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेत पीडितेच्या कुटुंबाला पाठिंबा दिला. दलित समाजातील मुलींना लक्ष्य करून अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे
Ans: ही घटना मध्यरप्रदेश मधील भिंड जिल्ह्यात घडली.
Ans: मुलीच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले आणि त्यानंतर प्रकरण उघड झाले.
Ans: पोलिसांनी आरोपी साहिल आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






