बिश्नोई गँगचा मोस्ट वाँटेड 'भिंडा' यवतमाळमध्ये गजाआड, थेट अमेरिकेतून पैशांचा पुरवठा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत तीस वर्षीय विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली. दोरीने बांधून चटके देण्यात आले. या मारहाणीत विवाहिता गंभीर जखमी झाली आहे. सासरच्या लोकांकडून हा मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. फुलंब्रीच्या चौकावडीयेथे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे घरगुती हिंसाचारमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे.
पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियावर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात पाठवलं
नेमकं काय आहे प्रकरण?
माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर परिणाम भोग, असं म्हणत 30 वर्षीय विवाहितेला दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकारात विवाहित गंभीर जखमी झाली आहे. पीडित विवाहितेचा आरोप आहे की, पती अजीम अब्दुल शेख, नणंद शबाना निसार शेख, आणि रिजवाना इम्रान शेख यांनी शारिरीक व मानसिक छळ केला. माहेरून पैसे आणावेत, या कारणावरून तिला दोरीने घरात बांधून अमानुष मारहाण केली. मारहाणीच्या वेळेस शरीरावर चटके दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित तीघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महिला अत्याचाराविरोधात पोलीस यंत्रणा सतर्क; 48 तासाच्या आत दाखल केले दोषारोपपत्र
शहरात महिलांबाबत होणाऱ्या गैरवर्तवणुकीला आाळा घालण्यसाठी कल्याण पोलिस यंत्रणा सतर्क होताना दिसत आहे. महिलांच्या अत्याचारासंबंधित गुन्ह्यात कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी 48 तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल केले आहे. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी, कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे.सविस्तर बातमी
मोठी बातमी! निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले दिल्लीतून अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी