फोटो सौजन्य: गुगल
शहरात महिलांबाबत होणाऱ्या गैरवर्तवणुकीला आाळा घालण्यसाठी कल्याण पोलिस यंत्रणा सतर्क होताना दिसत आहे. महिलांच्या अत्याचारासंबंधित गुन्ह्यात कल्याण परिमंडळ 3 च्या पोलिसांनी 48 तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल केले आहे. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी, कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे.
कोणतीही घटना असो पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल होतो. प्रकरणाच्या सुरू तपास होतो. 90 दिवसाच्या आत पोलिसांना तपास करून सदर प्रकरणातील दोषारोप पत्र कोर्टात दाखल करायचे असते. आरोपीला कठोराlतील कठोर शिक्षा होईल यासाठी पोलिसांकडे पुरावा गोळा करण्यासाठी 90 दिवसाची वेळ असते. कोर्टात आरोप पत्र दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. यादरम्यान असे अनेक प्रकार असतात.
ज्यामध्ये आरोपींना जामीन देखील मिळून जातो. कल्याण परिमंडळतील पोलिसांनी एक चमकदार कामगिरी केली आहे. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या संबंधित गुन्ह्यात 48 तासाच्या आत गुन्हा दाखल करून फक्त आरोपीला अटक नाही,तर कल्याण कोर्टात दोषारोप पत्र देखील दाखल झाले आहे. कल्याणच्या मानपाडा आणि कोळसावाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या महिलांसोबत गैर प्रकाराबद्दल या तीन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. या तीन पोलीस स्टेशन मधील तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला.
महिलांसोबत घडलेल्या प्रकाराच्या सर्व पुरावा गोळा करण्यात आला. आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये यासाठी पोलिसांनी अहोरात्र काम केले. आणि अखेर 48 तासांच्या आत कल्याण कोर्टात आरोप पत्र दाखल करण्यात आला आहे राज्यात ही पहिली घटना असेल ज्यामध्ये एका शहरात तीन पोलीस ठाण्यात तीन गुन्ह्यात 48 तासांच्या आत आरोपी मिळतात आरोप पत्र दाखल झाल्याची घटना घडली आहे.