एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने २६ वर्षांच्या शिक्षिकेवर पेट्रोल फेकून पेटवल्याची घटना समोर आली आहे. शिक्षिका ही २० टक्के भाजली आहे. असे करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव सूर्यांश असे आहे. या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील नरसिंगपूर जिल्ह्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला आहे.
गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास २६ वर्षीय शिक्षिका तिच्या घरी चालली होती. त्यावेळी सूर्यांश हा विद्यार्थी तिथे आला. त्याने बाटलीतून आणलेलं पेट्रोल या शिक्षिकेच्या अंगावर टाकलं आणि काडी पेटवली.या घटनेत या शिक्षिकीला १० ते १५ ठिकाणी भाजलं आहे. यानंतर या शिक्षिकेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार भाजल्याच्या या जखमा गंभीर आहेत पण शिक्षिकेच्या जिवाला धोका नाही.
सुर्यांश आणि पीडित शिक्षिका एकमेकांना मागील दोन वर्षांपासून ओळखतात. सूर्यांश या शिक्षिकेच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. १५ ऑगस्टच्या दिवशी २६ वर्षीय शिक्षिका शाळेत साडी नेसून आली होती. त्यावेळी या विद्यार्थ्याने शिक्षिकेबाबत अश्लील भाषेत टिप्पणी केली होती. ज्यानंतर शिक्षिकेने त्याची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. यानंतर मुख्याध्यापकांनी त्याला फैलावर घेतलं आणि शाळेतून काढून टाकल्याचा निर्णयही सांगितला. ज्यानंतर चिडलेल्या सूर्यांशने शिक्षिकेवर पेट्रोल फेकलं आणि तिला पेटवलं.
शिक्षिका २० टक्के भाजली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यांश शिक्षिकेच्या घराजवळ पोहचला होता. शिक्षिकेला जेव्हा त्याने पेटवलं तेव्हा ती आराडाओरड करु लागली. शेजारुन जाणाऱ्या लोकांनी तिला वाचवलं आणि आग विझवली. या घटनेत शिक्षिका २० टक्के भाजली आहे पण तिच्या जिवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला आहे. सोशल मीडियावर सदर आरोपीच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होते आहे.
संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार
भंडाऱ्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मावस भावाकडून अत्याचार व मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी मिळाल्यामुळे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्याआधी तिने सुसाईड नोट लिहून ठेवले. सुसाईड करण्याआधी तिने आरोपींची नावे लिहून त्यांना तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरवले आहे.
Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश