मुलानेच आई-वडील आणि भावाला दगडाने चिरडून केली हत्या (फोटो सौजन्य-X)
Delhi Crime News in Marathi: दिल्ली तिहेरी हत्याकांड प्रकरण राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आरोपीने त्याच्या आई-वडिलांची आणि मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. नेमकं असं काय घडलं? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण?
दक्षिण दिल्लीतल्या साटबाडी गावात तिहेरी हत्याकांड घडलं आहे. ही घटना बुधवारी (20 ऑगस्ट) दक्षिण दिल्लीतील खरक रिवाडा गावात घडली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सिद्धार्थ असं नाव असलेल्या मुलाने आई, वडील आणि भावाची हत्या केल्याची ही घटना आहे. याबाबतची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्या घरात या मुलाने हाताची नस कापून घेतली होती. त्यामुळे घरात रक्तही मोठ्या प्रमाणावर आढळलं अशीही माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीने आई, वडील आणि भावाची निर्घृण हत्या केली. त्याने तिघांच्याही मानेवर धारदार शस्त्रांनी वार केले. याशिवाय त्याने विटा आणि दगडांनी हल्लाही केला. घटनास्थळावरून पोलिसांना धारदार शस्त्रे आणि विटा आणि दगडही सापडले आहेत. रजनीचे तोंड कापडाने बांधलेले होते. आरोपीचे भाऊ आणि वडील एका खाजगी कंपनीत काम करत होते. याप्रकरणी पोलीस गुरुवारी तिघांच्याही मृतदेहांचे शवविच्छेदन करणार आहेत. वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन केले जाईल. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रस्त्यावरून जाताना दिसत आहे.
पोलिसांचा सिद्धार्थवरचा संशय वाढताच एका तरुणाने जबाब दिला. त्याच्या एका मित्राने सांगितले की, सिद्धार्थ आज संध्याकाळी त्याला भेटला होता. सिद्धार्थने त्याला सांगितले की, आज त्याने त्याचे संपूर्ण कुटुंब संपवले आहे. आजनंतर तो गावात दिसणार नाही. पोलिसांनी संबंधित तरुणाचे जबाबही नोंदवले आहेत. याशिवाय आरोपीच्या शोधात छापे टाकले जात आहेत.
पोलीस तपासात सिद्धार्थ ड्रग्ज व्यसनी असल्याचे उघड झाले. तो कोणतेही काम करत नाही. त्याचे आईवडील आणि मोठा भाऊ यासाठी त्याला फटकारत होते. यावरून तो दररोज कुटुंबाशी भांडण करायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरातून त्याच्या उपचारांशी संबंधित काही कागदपत्रे आणि औषधे सापडली आहेत. याअंतर्गत सिद्धार्थ गेल्या १२ वर्षांपासून वेगवेगळ्या संस्थांमधून त्याच्या मानसिक आजारावर उपचार घेत होता. मानसिक आजारामुळे तो दररोज कुटुंबाशी भांडत असे. याशिवाय त्याला ड्रग्जचेही व्यसन होते. यावरून त्याचे मोठ्या भावाशीही अनेकदा भांडण झाले.