पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफियावर पोलिसांची मोठी कारवाई; गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात पाठवलं (फोटो सौजन्य-X)
पंढरपूर : पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुका अंतर्गत भीमा व मान नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करणारा सराईत गुन्हेगार अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. सदर आरोपीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल असून, मंगळवेढा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
अजिंक्य रोकडे याच्यावर एक गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल आहे. तिन्ही पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दमदाटी करणे, मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक करणे असे प्रकार करत होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून वाळूमाफिया व सराईत गुन्हेगार अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे (वय २८, रा. ओझेवाडी. पंढरपूर) यास एमपीडीए कायद्यांर्तगत स्थानबध्द करून येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले.
हेदेखील वाचा : Vaishnavi Hagawane Case: फरार होण्यासाठी आखला होता मास्टरप्लॅन, पण मैत्रिणीमुळे असा अडकला निलेश चव्हाण
सदर वाळूमाफिया व सराईत गुन्हेगार अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे हा पंढरपुर तालुका पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे. तो त्याचे साथीदारासह पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे, अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणे, वाळू साठा करणे, सरकारी नोकरास ते करत असलेले कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा वारंवार भंग करून गुन्हे केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.