मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. लोकलमधून पळून अनेक प्रवाश्यांचे मृत्यू झालं आहे. आता लोकल मधून पळून नाही तर धावत्या ट्रेनमधून
प्रवाशाने नारळ फेकल्याने एकाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आली आहे. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील, भाईंदर रेल्वे खाडी ब्रीजवर घडली आहे. संजय दत्ताराम भोईर (वय 25) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत अधिकची माहिती अशी की, संजय भोईर नायगावच्या पाणूज बेटावर राहतो. तो शनिवारी सकाळी घरातून साडे आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी असल्याने नागरिकांना शहरात जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते. मृतक संजय हा गोरेगावला एका खासगी कंपनीत काम करत होता. दरम्यान, हवामान खराब असल्याचे संजय भोईर याने मुंबईला कामावर जाण्यासाठी भाईंदर खाडीवरील ब्रीजवरुन नायगाव स्टेशन गाठण्याच ठरवलं. बोट असल्यामुळे अनेकदा नागरीकांना या ब्रीजवरुन जीवघेणा प्रवास करावा लागतो. पूलावरुन चालत असताना चालू लोकलमधून एका प्रवाशाने नारळ फेकला. तोच नारळ संजयच्या डोक्याला लागला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना इतर प्रवाशांनी पाहिल्यानंतर संजयच्या घरच्यांना बोलावण्यात आलं होत. संजयच्या घरच्यांनी त्याला प्रथम महानगर पालिकेच्या रुग्णालयात हलवलं. तिथून त्याला वसईच्या प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी त्याला मुंबईच्या नायर रुग्णलयात शिफ्ट केलं होत. मात्र त्याचं मृत्यू झाला. आजवर या गावात किमान 10 ते 12 घटना घडल्या असल्याची माहिती गावच्या सरपंचांनी दिली आहे.
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस
मराठवाडा विदर्भप्रमाणेच राज्यातील इतर भागात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यासह आता मुंबई आणि उपनरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्य़ाने दिला आहे. येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
काल रात्रीपासूनच विजांच्या गडगडाटासह मुंबई, ठाणे पालघर आणि इतर कोकण भागात पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. आधीच मेगा ब्लॉक आणि त्यात पावसाची जोरदार बॅटींग यामुळे लोकल वाहतूकीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे.