Jalna Politics: भाजप उमेदवाराला समर्थन आणि पक्षाशी गद्दारी;काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांना पक्षाबाहेरचा रस्ता
Jalna Politics: जालना शहर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी पक्षादेश न मानता भाजपाला समर्थन दिले होजे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने सात नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नव्याने झालेल्या जालना शहर महापालिकेची पहिलीच निवडणूक तर जानेवारी महिन्यात झाली. या निवडणुकीत काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आघाडी करुन निवडणूक लढवली होती.
जागावाटपात एकमत न झाल्याने ऐनवेळी भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपाने ४२ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. तर शिवसेनेचे १२ उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे ९ उमेदवार विजयी झाले होते. संख्याबळानुसार भाजपाला ४, शिवसेनेला एक आणि काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक पद आले होते. त्यानुसार भाजपाने चार जणांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने भास्करराव अंबेकर यांचे चिरंजीव अश्विन अंबेकर यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने यांना उमेदवारी दिली. मात्र, स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवेळी गटनेता फारुख तुंडीवाले यांनी भाजपाचे पराभूत उमेदवार विनोद रत्नपारखे यांना समर्थन दिले.
Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद
यावरुन मनपा कार्यालयातच फारुख तुंडीवाले यांच्याशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांचा वाद झाला होता. पक्षश्रेष्ठीकडे याबाबतचा अहवाल दिला जाणार असून, पक्षश्रेष्ठी कारवाई करतील, असे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी म्हटले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी जालना महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते तुंडीवाले यांच्यासह सात नगरसेवकांचे निलंबन केले आहे.
Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी भाजपाला खुले समर्थन दिल्याने पक्षाची शिस्तभंग केल्याचा आरोप या सातही नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे. मनपातील काँग्रेसचा गटनेता फारुख तुंडीवाले, इम्रान खान अमानुल्ला खान, मयुरी दिनेश दैने, फरहाना अब्दुल रुऊफ अन्सारी, सुनील अशोक बोर्डे, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे यांचा निलंबन केलेल्यांत समावेश आहे. सातही नगरसेवक कसे सामोरे जातात या कारवाईला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






