Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

पहाटे तीन वाजेच्या सुमारास विवाहीतेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १४ हजारांच्या दंडाची सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 05, 2026 | 11:47 AM
पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्...; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्...; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पहाटे तीन वाजेच्या सुमारास विवाहीतेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १४ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी ३ जून रोजी ठोठावली आहे. विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडाच्या रक्कमेतील १० हजार रुपये हे पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे देखील आदेशात नमुद करण्यात आले आहे. मन्सूरखान मज्जुखान पठाण (२५, रा. सिल्लोड) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.

 

या प्रकरणात २३ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १३ मार्च २०२३ रोजी पहाटे तीन वाजता मन्सूरखान पठाण याने पीडितेच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच तो घरात घुसला. त्याने महिलेचा विनयभंग केला. पीडिता ओरडल्याने तिचा पती जागा झाला. त्यावेळी आरोपीने पतीचा गळा दाबून मारहाण केली व कोणाला काही सांगितल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत पसार झाला. याबाबत पीडितेने १४ मार्च रोजी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी दिलेल्या पुरवणी जबाबात पीडितेने आरोपीने घरात घुसल्यानंतर तिला पलंगावर पाडून तोंड दाबले व जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे सांगितले. त्याचवेळी तिचा पती जागा झाल्यावर आरोपीने त्यालाही मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : संतापजनक! ‘मदत करतो’ म्हणत घरी नेलं अन्… 80 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार

या प्रकरणात पाच साक्षीदाराचे जबाब नोंदवले

तपास अधीकारी तत्कालीन उपनिरीक्षक एस. बी. वाघुले यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता अॅड. सुजाता देशमुख यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणी अंती न्यायालयाने आरोपीला भा.दं. वि कलम ३७६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, कलम ३५४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये सहा महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Court sentences accused of molesting married woman in sillod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Court News
  • crime news

संबंधित बातम्या

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
1

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
2

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
3

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
4

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.