Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गुन्हे शाखा युनिट-१ ने सराईत घरफोड्याला अटक करत १३ घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध यापूर्वी ४९ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 04:17 PM
४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Follow Us
Follow Us:
  • सराईत घरफोड्या जेरबंद
  • गुन्हे शाखा युनिट-१ कडून १३ घरफोडींची उकल
  • आरोपीविरुद्ध यापूर्वी ४९ गुन्ह्यांची नोंद
सावन वैश्य | नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक करून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या १३ घरफोडीच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे २१ लाख २१ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये २४५.६७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २०८.४५ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीच ४९ गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे तसेच पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लक्ष्मण सुदेश शिवशरण (वय ४८, रा. राज पॅलेस सोसायटी, कळ्हेर, भिवंडी, जि. ठाणे) याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने अनेक घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

पुढील तपासात आरोपीने रबाळे, कोपरखैरणे, वाशी आणि तुर्भे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले. कारवाईदरम्यान आरोपीकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण २१.२१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने संबंधित तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तपासात आरोपी हा सराईत घरफोड्या असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी ४९ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. अटकेनंतर उघडकीस आलेल्या या १३ गुन्ह्यांमुळे त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आणखी मोठा पर्दाफाश झाला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडीक, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय महात्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक खैरे, पोलीस हवालदार चंद्रकांत कदम, विश्वास भोईर, महिला पोलीस हवालदार अंजली विशे, पोलीस नाईक असगर मिर्झा, पोलीस शिपाई सचिन पाटील, भारत सावंत, विशाल सावरकर तसेच महिला पोलीस शिपाई स्नेहा घोरपडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, सराईत गुन्हेगारांविरोधातील नवी मुंबई पोलिसांची प्रभावी मोहीम पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Web Title: Crime branch unit 1 arrests serial burglar solves 13 house break ins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
1

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल 2020 प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; SIT चौकशीसह सर्व याचिका फेटाळल्या

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
3

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
4

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.