कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरू पोलिसांनी (Mengluru Police) अंमली पदार्थांच्या तस्करीचे (Drugs Peddling) मोठे रॅकेट उघड केले आहे. येथे भारतीय वंशाचा परदेशी नागरिक (A foreign national of Indian origin) एमबीबीएस डॉक्टरांसह वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाचा पुरवठा करत असे. हा तरुण डेंटल कॉलेजमध्ये शिकत आहे. या संपूर्ण टोळीतील १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे कनेक्शन तपासले जात आहे. आरोपी गांजा व्यतिरिक्त इतर अंमली पदार्थांचा पुरवठा करत असे का, याचा शोध घेत आहोत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी बुधवारी सांगितले की त्यांनी नील किशोरीलाल रामजी शॉ (३८) या भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला गेल्या आठवड्यात त्याच्या फ्लॅटमध्ये गांजा विकल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. चौकशी केली असता त्याने इतर सहकाऱ्यांनाही पुरवठा केल्याची माहिती दिली. रामजी शा हे गेल्या १५ वर्षांपासून मंगळुरू येथे राहत असून शहरातील दंत महाविद्यालयात चौथ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. चौकशीदरम्यान, शॉने इतर वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि गांजाची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या डॉक्टरांची माहिती दिली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडून ५०,००० रुपये किमतीचा दोन किलो गांजा, दोन मोबाईल फोन, एक बनावट पिस्तूल, एक खंजीर, ७,००० रुपये रोख, एक डिजिटल वजनाचे यंत्र आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
[read_also content=”‘पतली कमरिया मोरी’ गाण्यावर महिला शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर करतोय कल्ला, मुलांनी असं केलं स्वागत; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/video-of-female-teacher-on-song-patli-kamariya-mori-goes-viral-social-media-children-welcome-like-this-nrvb-361267.html”]
अन्य ९ आरोपींमध्ये दोन डॉक्टर आहेत. शहरातील तीन व्यावसायिक महाविद्यालयांतील सात वैद्यकीय/दंतवैद्यकीय विद्यार्थी आहेत, जे वेगवेगळ्या राज्यातील आहेत. यामध्ये चार मुलींचाही समावेश आहे. या सर्वांना वसतिगृह, पीजी आणि खासगी निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून भांग आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
[read_also content=”ऑनलाइनच त्याच्यावर भाळली, दोन लेकरांना दिलं सोडून; अखेर त्यानेच वाऱ्यावर सोडलं; वाचा दर्दभरी प्रेमकथा https://www.navarashtra.com/crime/love-lagna-lochya-samastipur-mother-of-two-children-falls-in-love-on-facebook-lover-ran-away-leaving-her-at-the-railway-station-nrvb-361250.html”]
हे लोक सिंथेटिक ड्रग्सचे सेवन आणि तस्करी करत होते का, याचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना आज स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.






