Crime News: विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ; राष्ट्रवादीच्या नेता फरार
Crime News: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका नेत्यावर विवाहितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. आरोपीने पीडितेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे.
Thackeray Brothers alliance :ठाकरे बंधूंच्या युतीला कॉंग्रेसचं ग्रहण? राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय?
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी गावातील रहिवासी अभिजीत कुडे याच्यावर गंभीर आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, कुडे काही दिवसांपासून त्या गावातील विवाहित महिलेवर लैंगिक शोषण करत होता. सुरुवातीला त्याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला आणि तिला वारंवार मेसेज व कॉल करून बाहेर भेटायला बोलावलं. नंतर त्याने दोन ते तीन वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेने नमूद केले आहे. वर दिलेल्या तक्रारीनंतर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही; त्याने शरीरसंबंध ठेवताना काही फोटो आणि व्हिडीओ देखील काढले होते. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाने कंटाळलेल्या पीडितेने घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर दोघंही वरोरा पोलीस ठाण्यात हजर झाले. पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी अभिजीत कुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. मात्र गुन्हा नोंद होताच आरोपी पोलीस ठाण्यातून पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
IIT JAM 2026: आयआयटी जॅम एक्झामसाठी नोंदणी तारीखमध्ये वाढ, आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी
या प्रकरणात पीडितेने आपबीती सांगितली आहे. “माझ्या गावातील एक व्यक्ती मला कॉल आणि मेसेज करत होता. त्याच्याकडे काही रेकॉर्डिंग आहे, आहे की नाही, हे मला माहीत नाही. पण याच आधारावर तो मला ब्लॅकमेल करून माझ्याशी संबंध ठेवू इच्छित होता. त्याने दोन ते तीन वेळा अशा प्रकारे माझ्याशी संबंध ठेवले. यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात आलो. कालच तो पोलीस ठाण्यात आला होता, परंतु तिथून पसार झाला. अत्याचाराबाबत मी माझ्या पतीला सांगितल्यामुळे त्याने माझ्या पतीवर चुकीचे आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. मला न्याय मिळावा, नाहीतर तो माझ्यावर सतत अत्याचार करीत राहील.”