Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने दोघांची फसवणूक; सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांना घातला गंडा

राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2025 | 12:30 AM
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने दोघांची फसवणूक; सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांना घातला गंडा

शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने दोघांची फसवणूक; सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने चोरटे फसवणूक करत आहेत. फसवणुकीचे सत्र सातत्याने सुरूच असल्याचे देखील यावरून दिसत असून, पोलिसांकडून जनजागृती केली जात असताना नागरिक या आमिषांना बळी पडत असल्याचेही दिसत आहे.

याप्रकरणी पहिल्या घटनेत नांदेडसिटी पोलिस ठाण्यात ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सिंहगड रोड परिसरात राहण्यास आहेत. त्यांना सायबर चोरट्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच, त्यांना शेअर ट्रेडिंग केल्यानंतर चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यांना काही माहिती देऊन विश्वास संपादन केला. नंतर त्यांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी म्हणून त्यांच्याकडून केवळ २३ दिवसात एकूण ३४ लाख ९५ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना परतावा किंवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस करत आहेत.

दुसऱ्या घटनेत देखील अशाच पद्धतीने ३६ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार २५ मार्च ते १४ मे या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी हडपसरमधील व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांना शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अधिक तपास पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप या करत आहेत.

Web Title: Cyber thieves dupe two people from pune under the pretext of share trading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Pune Crime
  • Pune Froud News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
1

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
2

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
3

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
4

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.