नवी दिल्ली : मंगळवारी संध्याकाळी दिल्लीच्या (Delhi) जगतपूर उड्डाणपुलाजवळील (Jagatpur Flyover) आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये (ICICI ATM) कॅश व्हॅनवर गोळीबार (Cash van Firing) करून ती लुटण्यात आली. तेथे एका रक्षकाची गोळ्या झाडून हत्या (Guard Murder) करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ही माहिती दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जगतपूर उड्डाणपुलाजवळील आयसीआयसीआय एटीएममध्ये आज दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास कॅश व्हॅन कॅश जमा करण्यासाठी आली. दरम्यान, मागून आलेल्या एका चोरट्याने कॅश व्हॅनच्या गार्डवर गोळीबार करून पैसे घेऊन पळ काढला. गार्डला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
[read_also content=”आई आहे की कैदाशीण! फ्लॅटमध्ये २० वर्षांच्या अविवाहित मुलीने दिला बाळाला जन्म, बदनामी होऊ नये म्हणून बाळालाच दिलं खाली फेकून, झाला मृत्यू https://www.navarashtra.com/crime/crime-unmarried-girl-gave-birth-to-a-child-in-new-ashok-nagar-delhi-and-threw-it-down-from-washroom-window-nrvb-360680.html”]
Cash van fired at and looted at ICICI ATM near Jagatpur flyover today evening, guard dead; further investigation underway: Delhi Police
— ANI (@ANI) January 10, 2023
दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “संध्याकाळी पाचच्या सुमारास, गोळीबाराच्या घटनेसह कॅश व्हॅन लुटल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता कॉल योग्य असल्याचे आढळून आले. पुढील तपास सुरू आहे.”
[read_also content=”हैवानपणाचा कळस! आंध्र प्रदेशात दारू पिऊन भिकारी महिलेवर केला तीन दिवस बलात्कार, तिघांना अटक https://www.navarashtra.com/crime/andhra-pradesh-crime-beggar-woman-raped-case-for-3-days-after-drinking-alcohol-3-arrested-nrvb-360760.html”]