
चोरीच्या आरोपावरुन दलित मुलीला गावभर फिरवलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; आरोपीवर तक्रार दाखल
Uttarpradesh Crime: शेजाऱ्याची हैवानीयत! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित गर्भवती
मुलीवर घेण्यात आला चोरीचा आळ
मिश्राैला गावात राहणाऱ्या राम ईश्वर यांचा मुलगा हरिकेश गुप्ता किराणाचं दुकान चालवतं होता. दाव्यानुसार, त्याने गावातील किशोरी नावाच्या मुलीवर चोरीचा आळ घेतला. रविवारी किशोरीला पकडल्यानंतर आरोपीने तिचे केस पकडत संपूर्ण गावातून तिला फिरवलं. यानंतरही जेव्हा त्याने मन भरले नाही तेव्हा त्याने त्याच्या घराजवळ असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला तिला बांधलं आणि बेदम मारहाण करयला सरुवात केली. घटनेदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एकाने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मिडियावर पोस्ट केला ज्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तातडीने यावर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, ३१ मे रोजी त्यांना ११२ या आपत्कालिन हेल्पलाईन नंबरवरुन त्यांना काॅल आला ज्यानंतर त्यांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर पोलिस घटनेस्थळी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी १४ वर्षीय किशोरीची सुटका केली. पिडित मुलगी अनुसूचित जाती समुदायाची होती ज्यामुळे भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तरतूदींनुसार आता आरोपी गुप्तावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रतापगढमध्ये घडली अशीच एक घटना
दरम्यान मागेच प्रतापगढमधून देखील अशीच एक घटना समोर आली होती ज्यात गावकऱ्यांना चोरी करायला आलेल्या तीन युवकांना पळवत त्यांचा पाठलाग केला. यातील एकाने गोळीबार करत तिथून आपला पळ काढला तर बाकी दोन व्यक्तींना गावकऱ्यांनी पकडून झाडाला बांधून मारले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही आपल्या ताब्यात घेतले. या घटनेचाही व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता ज्यात गावकरी झाडाला बांधून दोघांना मारताना दिसले.