Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Accident: टायर फुटल्याने भरधाव कार चहाच्या टपरीत घुसली; धाराशिवमध्ये माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे सोलापूर–हैदराबाद महामार्गावर कारचे टायर फुटल्याने कार चहाच्या टपरीत घुसली. या भीषण अपघातात माजी नगरसेवक बळीराम पवार आणि व्यावसायिक लाडनशा मुर्शीद यांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 10:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उमरगा येथे कारचे टायर फुटल्याने वाहन चहाच्या स्टॉलमध्ये घुसले.
  • अपघातात माजी नगरसेवक बळीराम पवार व व्यावसायिक लाडनशा मुर्शीद यांचा जागीच मृत्यू.
  • दोन जण जखमी; टपरीसह परिसरातील तीन दुकानांचे नुकसान.
धाराशिव: धाराशिव येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. कारचे टायर फुटले आणि कार थेट चहाच्या टपरीत घुसली. यावेळी चहाच्या टपरीत बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी उमरगा शहराजवळील जकेकूर चौक (चौस्ता परिसर) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Mumbai Crime: ‘एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील…चारित्र्यावर आरोप, मानसिक छळ; MDS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय नेमकं प्रकरण?

काय घडलं नेमकं?

तेलंगणा राज्यातील एक नव दाम्पत्य तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन हैदराबादकडे परत जात होते. यावेळी सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा चौकाजवळील भारत टायर दुकानासमोर मारुती सुझुकी कार (क्रमांक टीएस 34 एफ 4706 / ) भरधाव वेगाने जात असताना अचानक उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कर रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये घुसली.

त्यावेळी स्टॉलवर माजी नगरसेवक बळीराम कृष्णा पवार (वय 48),तथा जनता अर्थमूवर्सचे मालक लाडनशा गुलाबशा मुर्शीद (वय 52) आणि मेकॅनिक सचिन भिमाशंकर कुटार (30)हे चहा पित बसले होते. त्यावेळी अचानक कार घुसल्याने बळीराम पवार व लाडनशा मुर्शीद यांचा जागीच मृत्यू झाला, तर यात सचिन कुटार गंभीर जखमी झाले. तसेच टपरीचालक महादेव देढे यांनाही दुखापत झाली आहे.

अपघातामुळे तीन दुकानांचे नुकसान

या भीषण अपघातात चहाच्या टपरीसह परिसरातील तीन दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरु आहे.

कला केंद्रावर सशस्त्र दरोडा; 9 लाखांचा सोनं लंपास, डोक्याला पिस्तूल लावून धमकी

येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरामध्ये राहणाऱ्या निर्मला जाधव या कलाकेंद्र चालवून आपल्या पोटाची गुजरात करतात. त्यांचं बार्शी रोड वरती एक स्वतःचे कला केंद्र आहे मात्र पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून घरातील जवळपास सहा लाख रुपयांचा सोन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताना आरोपींनी डोक्याला थेट पिस्तूल लावली आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याची धमकी दिली. पहाटेच्या सुमारास घरात येऊन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि निर्मला जाधव यांच्या घरातील एकूण मुद्देमाल जवळपास नऊ लाख 51 हजार रुपयांचा सोनंलंपास केलं. या प्रकरणात आता येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निर्मला जाधव या धाराशिव साखर कारखान्याच्या जवळ क्रमांक 12 मध्ये कला केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्यासोबत लहानपणापासूनची त्यांची मैत्रीण रेखा शिंदे (रा. टाकळी जिल्हा परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हे एकत्र राहत  होते.

Paper Leak: धक्कादायक! पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर लीक, टेलिग्राम ग्रुपवर तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल; गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहराजवळ सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जकेकूर चौक परिसरात.

  • Que: अपघाताचे कारण काय होते?

    Ans: भरधाव कारचे उजव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार चहाच्या टपरीत घुसली.

  • Que: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.

Web Title: Dharashiv accident speeding car crashes into tea stall after tire bursts two dead including former corporator in dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Dharashiv News : लाखोंचा खर्च करुनही 108 रुग्णवाहिका सेवा ठप्पच ! प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा तीव्र संताप
1

Dharashiv News : लाखोंचा खर्च करुनही 108 रुग्णवाहिका सेवा ठप्पच ! प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा तीव्र संताप

Solapur Crime: धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; सोलापुरातील घटना
2

Solapur Crime: धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; सोलापुरातील घटना

Beed Crime: पत्नीला फोन केल्याचा राग; बीडमध्ये पतीवर लोखंडी रॉड-दगडांनी जीवघेणा हल्ला; ‘ती’ आता माझी आहे…
3

Beed Crime: पत्नीला फोन केल्याचा राग; बीडमध्ये पतीवर लोखंडी रॉड-दगडांनी जीवघेणा हल्ला; ‘ती’ आता माझी आहे…

Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल
4

Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.