Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: सावत्र आईला मूल झाल्यास संपत्तीत वाटेकरी वाढतील… रागातून १७ वर्षीय मुलाने बापाचा खून

धाराशिव जिल्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने झोपेत असलेल्या जन्मदात्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण करून थेट पोलीस ठाण्यात जाऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 18, 2026 | 01:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अणदूर शिवारात शेतात झोपेत असलेल्या वडिलांची दगडाने हत्या
  • हत्या करून आरोपी मुलगा हॉटेलमध्ये जेवला, नंतर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
  • कुटुंबनियोजन व संपत्ती वाटपाच्या भीतीतून वाद, त्यातून हत्या
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातून एक हत्येचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. वडील झोपेत असतांना दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण केलं त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. कुटुंबनियोजन आणि दुसऱ्या लग्नावरून वाद सुरु झाला आणि या वादाचा रूपांतर हत्येत झालं. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव महिपती आंबाजी सुरवसे (वय 45, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आहे. ही घटना १६ जानेवारीला साडेपाचच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात घडली.

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला; देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात, 5 ठार

काय नेमकं प्रकरण?

मृतक हिपती आंबाजी सुरवसे यांना दोन बायका होत्या. पहिली पत्नी मरण पावल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले हो पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. भविष्यात आणखी मुले झाल्यास आमच्या वाट्याची संपत्ती विभागली जाईल या भीतीने पहिल्या पत्नीची दोन्ही मुलं वडिलांकडे सावत्र आईचे कुटुंबनियोजन करण्याची वारंवार मागणी करत होती. मात्र, पित्याने याकडे दुर्लक्ष केल्याने घरात सतत वाद होत होते.

वडील शेतात झोपले असतांना…

शुक्रवारी दुपारी वडील आपल्या शेतात गेले होते. हीच संधी साधत 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा त्यांच्या मागावर शेतात पोहोचला. शेतात काम करून वडील गाढ झोपलेले असल्याचे पाहून रागाच्या भरात बाजूला पडलेला मोठा दगड उचलून त्याने थेट वडिलांच्या डोक्यात घातला. हा प्रहार इतका भीषण होता की महिपती सुरवसे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने कोणताही थरकाप न दाखवता मोटरसायकल काढली आणि तो नळदुर्ग शहरात आला. तेथील एका हॉटेलमध्ये पोटभर जेवण केलं. त्यानंतर थेट तो नळदुर्ग पोलीस ठाण्यात हजर झाला. तिथे त्याने हत्येची कबुली दिली. ‘मी माझ्या वडिलांचा खून केला आहे, मला अटक करा’ अशी कबुली त्याने पोलिसांपुढे दिली.

पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला धाराशिव येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर; खारघरमधील 80 वर्षीय वृद्धाची 4.38 कोटींची ऑनलाईन फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथे १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास.

  • Que: हत्येचे मुख्य कारण काय होते?

    Ans: सावत्र आईला पुढे मूल झाल्यास संपत्तीत वाटा कमी होईल या भीतीतून कुटुंबनियोजनावरून वाद सुरू होते.

  • Que: आरोपीवर कोणती कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत कारवाई करत बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Web Title: Dharashiv crime fearing that the birth of a child to his stepmother would increase the number of heirs to the property

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Gujrat News: पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्यास दिला नकार आणि…, २२ वर्षीय महिलेने गळफास घेतला
1

Gujrat News: पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्यास दिला नकार आणि…, २२ वर्षीय महिलेने गळफास घेतला

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर; खारघरमधील 80 वर्षीय वृद्धाची 4.38 कोटींची ऑनलाईन फसवणूक
2

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर; खारघरमधील 80 वर्षीय वृद्धाची 4.38 कोटींची ऑनलाईन फसवणूक

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला; देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात, 5 ठार
3

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला; देवदर्शनासाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात, 5 ठार

Uttar Pradesh Crime: ८ महिन्यांच्या लग्नाचा रक्तरंजित शेवट; पत्नीने डॉक्टर प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या
4

Uttar Pradesh Crime: ८ महिन्यांच्या लग्नाचा रक्तरंजित शेवट; पत्नीने डॉक्टर प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.