मुंबईवर ड्रोन हल्ल्याचा धोका; वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क (File Photo : Police)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. गुन्हा ज्या ठिकाणी घडला, त्याच ठिकाणी आरोपींची धिंड काढण्याचा नवा पद्धत पुणे पोलिसांनी अवलंबली आहे. मात्र, काही गुन्हेगार अजूनही सुधरत नसल्याने पोलिसांनी त्यांना कडक इशारा दिला आहे. महिलांची छेडछाड कराल किंवा सार्वजनिक ठिकाणी कोयते फिरवाल, तर भर चौकात चोप दिला जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील स्वयंघोषित “भाईंना” पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. बिबवेवाडी परिसरातील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांची मिरवणूक काढत पोलिसांनी इतर गुन्हेगारांनाही कडक इशारा दिला.
Pune Police News: महिलांची छेडछाड कराल तर…; भाईगिरी करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा सज्जड दम
ज्या भागात आरोपींनी दहशत माजवली, त्याच भागात त्यांना फिरवून पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार आणि गावठी कट्टा पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत. धिंड काढताना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की, जर कोणी महिलांची छेडछाड केली किंवा उघडपणे कोयते फिरवले, तर त्यांना भर चौकात चोप दिला जाईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर कठोर कारवाईसाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना थेट निर्देश दिले आहेत—”गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, त्यांची धिंड काढा.” त्यानुसार पुणे पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे. येरवडा, कोंढवा आणि इतर भागांतही पोलिस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. कोयते फिरवणे, महिलांची छेडछाड करणे आणि रोड रोमिओगिरी यासारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचा “धिंड पॅटर्न” प्रभावी ठरत आहे.
Magh Purnima 2025: माघ पौर्णिमेच्या दिवशी घरात कर हे उपाय, देवी लक्ष्मीची राहील कृपा
दरम्यान दोन दिवसांपूर्वी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामीन मिळाल्यावर येरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि त्याच्या साथीदारांनी परिसरात फेरी काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कसबे आणि त्याच्या ३५ ते ४० साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी कसबेच्या काही साथीदारांना अटक केली आणि येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढत भर चौकात चोप दिला. नागरिकांसमक्ष पोलिसांनी तात्पुरता मंडप उभारून आरोपींना चांगलीच शिक्षा दिली, ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले. दरम्यान, मुख्य आरोपी प्रफुल्ल कसबे फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.






