Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यावर हा हल्ला झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी आरोपी राहुल तायडे याला अटक करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 02:28 PM
कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद

कल्याणमध्ये चाललंय तरी काय? मद्यधुंद तरुणाचा चक्क पोलिसांवर हल्ला, घटना CCTVमध्ये कैद

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला
  • पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
  • घटना CCTVमध्ये कैद
Police Constable Attack News Marathi : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल तायडे नावाचा तरुण मद्यधुंद अवस्थेत परिसरातील नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

तक्रार मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता आरोपी राहुल तायडे याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने काठीने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करत मारहाण केली.

Kalyan: ‘दृश्यम’ स्टाईल प्रियकराची हत्या, फ्लॅटमध्ये सडलेला मृतदेह अन् घरमालकाला दिला व्हॉईस मेसेज

या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राहुल तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.

कल्याण हत्या प्रकरण

कल्याणच्या मलंग रोड परिसरातील काकाचा ढाब्यावर एका हाय-प्रोफाईल हत्याकांडाने खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नीलकंठ सोसायटीमध्ये एका तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्येनंतर, आरोपी महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून तो लवकर कुजावा म्हणून २४ तास पाण्यात ठेवला. हत्येपासून आरोपी महिला फरार आहे. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक

Web Title: Drunk youth attacks police constable with stick in kalyan gauripada cctv viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • kalyan
  • police
  • viral video

संबंधित बातम्या

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम
1

Washim News: ‘कोम्बिंग’मध्ये ७ फरार आरोपी जेरबंद; वाशिम पोलिसांनी जिल्ह्यामध्ये राबविली शोधमोहीम

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
2

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
3

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
4

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.