व्हॉट्सअॅप टिप्सद्वारे शेअरची फसवणूक
प्रवर्तन निर्देशालयाने कारवाईदरम्यान दोन कंपन्यांची कार्यालये, प्रवर्तकांची निवासस्थाने, कमी किमतीत शेअर्स मिळालेल्या व्यक्तींची घरे, फायनान्स फर्मची कार्यालये तसेच प्रमोशनल व्हॉटसअॅप ग्रुप चालवणाऱ्या संशयितांच्या ठिकाणी छापे टाकले. यात ‘मेसर्स आर. एम. ड्रिप अँड संप्रंकलर्स सिस्टिम्स लिमिटेड’ आणि ‘मेसर्स आर अँड बी डेनिम्स लिमिटेड’ या दोन लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याचा संशय आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान संबंधित कंपन्यांनी निवडक व्यक्तींना साडेतीन कोटींपेक्षा जास्त शेअर्स आणि कन्व्हर्टिबल वॉरंट्स जारी केल्याचे समोर आले आहे.
Mumbai Crime News : सहाव्या मजल्यावरून चिमुकल्याला फेकले; सीसीटीव्हीने उघड केला धक्कादायक प्रकार
डिसेंबर २०२५ अखेरपासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत नावांच्या व्हॉटसअॅप कम्युनिटीजद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांना दररोज हे शेअर्स खरेदी करण्याच्या टिप्स पाठवल्या जात होत्या. हे ग्रुप हरियाणा आणि मुंबईतील व्यक्तींच्या सिम कार्डवर चालवले जात असून, त्यांचे संचालन भावनगर येथून होत होते. ‘आर. एम. ड्रिप’च्या शेअरचा मोठ्या प्रमाणात प्रचार करून ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये वाढ करण्यात आली. याच वाढलेल्या मागणीचा फायदा घेत कमी किमतीत शेअर्स पर्यंत ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ मिळवलेल्या लाभार्थ्यांनी आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना विकल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे.
कागदपत्रे केले जप्त
छापेमारीदरम्यान अफ्लुएन्स जेम्स, कावा एचयूएफ आणि कोमले कन्सल्टन्सी या लाभार्थी गटांची ओळख पटली असून, डिजिटल उपकरणे व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. नाशिकमधील सहभागामुळे स्थानिक गुंतवणूकदारांत खळबळ उडाली आहे.
‘पंप अँड डंप’ म्हणजे काय?
यात काही लोक कमी किमतीत शेअर्स घेऊन सोशल मीडियावरून प्रचार करतात. किंमत वाढल्यावर आपले शेअर्स विकून नफा कमावतात आणि भाव घसरल्याने सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी व्हॉटसअॅप किंवा टेलिग्रामवरील शेअर टिप्सवर विश्वास ठेऊ नये. ‘मल्टीबॅगर’ किंवा ‘गॅरंटीड रिटर्न’ देणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे. कंपनीची आर्थिक स्थिती तपासून संशयास्पद सल्ला मिळाल्यास सेबी किंवा पोलिसांकडे तक्रार करावी.
FAQ
तब्बल 200 कोटींची खाती कुणी आणि का गोठवली?
– अंमलबजावणी संचालनालयाने (ED) – Enforcement Directorate ने. महाराष्ट्रात मुंबई, नाशिक + गुजरातमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, भावनगर कारवाई केली.
हा 200 कोटींचा घोटाळा नक्की काय होता? Pump & Dump कसा झाला?
– ही WhatsApp मल्टीबॅगर घोटाळा केस आहे. या 2 कंपन्यांनी 3.5 कोटींपेक्षा जास्त शेअर्स + Convertible Warrants निवडक लोकांना स्वस्तात दिले.






