Photo Credit-Social Media एकनाथ शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाची गोळ्या घालून हत्या
पंजाब: पंजाबमधील मोगा येथे शिवसेना गटाच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगत राय मंगा असे या जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. मंगत राय यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात एक अल्पवयीन जखमी झाल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना गुरुवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मंगत राय दूध खरेदी करत होते. दरम्यान, रात्री १० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला, परंतु गोळी मंगाऐवजी १२ वर्षांच्या मुलाला लागली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मंगा यांनी ताबडतोब दुचाकीवरून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत त्यांची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठलाग करताना हल्लेखोरांनी पुन्हा मंगा यांच्यावर गोळीबार केला आणि यावेळी गोळी मंगा यांना लागली. मंगा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी मंगा यांना रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वींच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसरीकडे जखमी किशोरवयीन मुलाला मोगा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.
Beed Police News: बीड पोलिसांच्या नेमप्लेटबाबत मोठा निर्णय; जातीभेद निर्मुलनाच्या दिशेने पहिले पाऊल
या घटनेबाबत माहिती मिळताच विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगिंदर शर्मा रूग्णालयात दाखल झाले होते. दुसरीकडे मंगत राय मंगा यांच्या मुलीने सांगितले की, वडील गुरुवारी रात्री ८ वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण रात्री ११ वाजता कोणीतरी आम्हाला सांगितले की माझ्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. आम्हाला न्याय हवा आहे आणि तो मिळवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत
पोलिस उपअधीक्षक (शहर) रविंदर सिंह यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री दोन ठिकाणी गोळीबार झाला. “बगियाना बस्ती येथे एका सलून मालकाला दुखापत झाली,” असे ते म्हणाले. दुसऱ्या एका घटनेत, स्टेडियम रोडवर मंगत राय मंगा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला. मंगाचा मृतदेह सरकारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
छातीमध्ये सतत जळजळ होते? शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भव