हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसणारी लक्षणे
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायाम न करणे, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली जगभरात सगळीकडे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा झटका, वाढलेले कोलेस्ट्रॉल, कॅन्सर इत्यादी अनेक गंभीर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातील प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे हृदयविकाराचा झटका येणं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य – iStock)
एन्सेफलायटीस म्हणजे काय? एन्सेफलायटीस झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
शरीरात वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा झटका येण्यामागेचे प्रमुख कारण आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृद्यासह संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीराचे रक्तभिसरण बिघडते. हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे हाडांचे स्नायू कमकुवत होतात. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आज आम्ही हृयद्याविकारचा झटका येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
छातीमध्ये होणाऱ्या वेदना हृदयविकाराचा झटका येण्यामागेचे सामान्य लक्षण आहे. मात्र या लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय अचानक छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, घट्टपणा, जडपणा किंवा जळजळ इत्यादी लक्षणे दिसून येतात. तसेच वेदना वाढू लागल्यानंतर मान, डावा जबडा, खांदा, पाठ किंवा हातांपर्यंत पसरण्याची शक्यता असते.
मळमळ, उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. हा त्रास प्रामुख्याने महिलांमध्ये दिसून येतो. तुम्हाला जर कोणतेही कारण नसताना सतत उलट्या किंवा मळमळ होत असेल तर सामान्य लक्षणं न समजता योग्य उपचार घ्यावे. हृदयविकाराच्या झटका येण्याआधी अनेकांना अपचन किंवा छातीत जळजळ वाढण्याची शक्यता असते.
कामाच्या वाढलेल्या तणावामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला थकवा अनेक वेगवेगळ्या आजारांचे कारण आहे. पण कोणत्याही कारणाशिवाय शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. हृदयविकाराचा झटका येण्याआधी महिलांमध्ये ही लक्षणे दिसून येतात.