Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 हजारांची लाच घेणं भोवलं; महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले

अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी करुन ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी यांना रंगेहात पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2025 | 01:15 PM
30 हजारांची लाच घेणं भोवलं; महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले

30 हजारांची लाच घेणं भोवलं; महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी करुन ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी (वय ४९, रा. उपकार रेसिडेन्सी सांगली रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. तर कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असलेल्या तक्रारदाराने शहरातील एका अपार्टमेंटमधील १८ फ्लॅटमध्ये वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात दिली होती. हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार हा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटला असता राठी यांनी १८ प्लॅटचे प्रत्येकी ५ हजार रुपयेप्रमाणे ९० हजार रुपये दिल्यास प्रकरण मंजूर होईल असे सांगत लाचेची मागणी केली होती.

३० हजाराची लाच स्विकारताना ताब्यात

या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असता राठी यांनी ९० हजाराच्या मागणीस दुजोरा देत तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी दुपारच्या सुमारास राठी यांना ३० हजाराची लाच स्विकारताना ताब्यात घेतले. राठी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Executive engineer of mahavitaran caught red handed while accepting bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bribe News
  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
1

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
3

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…
4

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.