पिंपरीत व्यावसायिकाला धमकावून मागितली 5 कोटींची खंडणी; 25 लाख घ्यायला गेले अन्... (संग्रहित फोटो)
पिंपरी : कंपनीला महाराष्ट्रात काम करायचे असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत कंपनीची कागदपत्रे काढल्याचा दावा करून व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा प्रकार एमआयडीसी भोसरी परिसरात समोर आला आहे.
कंपनीची वाट लावण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत संबंधितांकडून २५ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नेलविन पालमट्टम वर्गिस (वय ५१, रा. प्लॉट नं. ६२, सेक्टर नं. २६, प्राधिकरण, निगडी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८, व्यवसाय समाजकार्य, रा. चिंतामणी चाळ, गांधीनगर, पोखरण रोड नं. २, ठाणे पश्चिम), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ५३, व्यवसाय समाजकार्य, ठाणे पश्चिम) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई
तसेच रमेश भिमा मांजरेकर (वय ३९, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, ठाणे पश्चिम) आणि सुनील राजेंद्र कानू (वय ३५, व्यवसाय कारवॉश, ठाणे पश्चिम) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आरोपी सुनील कानू ताब्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातही घडला होता असा प्रकार…
काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील सदाशिव पेठ भागात हॉटेलच्या केटरिंगचे कंत्राट टिकवून ठेवण्याच्या बदल्यात व्यावसायिकाला धमकावून 37 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश खाशाबा नलावडे (वय ५३), उमाकांत रामचंद्र वालगुडे (वय ५६), दिपक केशवराव धुमाळ (वय ६५, तिघेही रा. कोथरूड, पुणे), गणेश रत्नाकर भोज (वय ५३, रा. भिमपुरा कॅम्प), दिनेश अरुण खोडके (वय ४९), राजन शंकर कामठे (वय ५८ रा. फुरसुंगी) आणि नितीन हरिभाऊ वाघमारे (वय ५२ वर्षे, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






