Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

साडेदहाच्या सुमारास संबंधित नगरसेविका वैयक्तिक कामासाठी जात असताना जाधवने त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी नगरसेविका आणि त्यांच्या वडिलांना अर्वाच्च शिवीगाळ करून अश्लील हावभाव केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2026 | 09:04 AM
कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या रागातून नगरसेविकेला रस्त्यात अडवून शिवीगाळ, अश्लील हावभाव आणि धमकी देण्यात आली. याप्रकरणी तानाजी आनंदराव जाधव याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे वागणूक मिळत असल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास संबंधित नगरसेविका वैयक्तिक कामासाठी जात असताना जाधवने त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी नगरसेविका आणि त्यांच्या वडिलांना अर्वाच्च शिवीगाळ करून अश्लील हावभाव केले. तसेच ‘बघून घेतो’, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. ‘प्रभागातील कामे व्यवस्थित करत नाही’, असे म्हणत त्याने शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद केले.

Kalyan Railway Police : धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

रात्री साडेअकरा वाजता नगरसेविकेच्या घरी

जाधवने प्रभागातील घंटागाडी अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे. यापूर्वी सुमारे दोन महिन्यांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास तो नगरसेविकेच्या घरी गेला होता. प्रभागात कचरा साचला असून, तो दाखवण्यासाठी आताच्या आता माझ्यासोबत चला, असा आग्रह करत त्याने वारंवार मानसिक त्रास दिल्याचं तक्रारीत म्हटले.

महिलांचेही काढत होता व्हिडिओ

तसेच प्रभागात कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिलांचे जाधवकडून व्हिडिओ काढले जात असल्याची तक्रार आहे. व्हिडिओ काढू नका, कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करा, अशी मागणी महिलांनी केली. मात्र, त्यानंतरही व्हिडिओ काढण्याचा प्रकार सुरू राहिल्याने अनेक महिलांनी त्याच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

परळीत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

बीड जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना समोर आली होती. ‘तू मेरे साथ शादी कर, वरना भगाके ले जाऊंगा’ असे म्हणत पीडित तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बीड जिल्ह्यातील परळीत घडली.

एका अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त; पालिकेच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Web Title: Female corporator molested incident kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • crime news
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
1

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!
2

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
3

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.