Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेत जमिनीच्या रस्त्याच्या वादातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याच्या खून केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2026 | 03:19 PM
मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : मुळशीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेत जमिनीच्या रस्त्याच्या वादातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याच्या खून केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. गणेश रामभाऊ मरगळे (वय २३), सुनील रामभाऊ मरगळे (वय २०), विजय बाबूराव मरगळे, राजू ज्ञानेश्वर मरगळे (वय १९), राजू रामभाऊ मरगळे (वय २०, सर्व रा.करंजावणे वस्ती, किरकटवाडी, ता. मुळशी, जि. पुणे ) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

 

३० मे २०२० रोजी आरोपींनी भाऊ सामाजी मरगळे (वय ३८) यांचा खून केला होता. याबाबत भाऊ मरगळे यांचे चुलत भाऊ भगवान मरगळे (वय ३२) यांनी फिर्याद दिली होती. भगवान हे भाऊ मरगळे यांच्या बरोबर ३० मे २०२० रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पानशेत येथे किराणा माल आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

सांडवघर येथे दुचाकीस्वार आरोपी विजय मरगळे याने दुचाकीस्वार भगवान आणि भाऊ मरगळे यांना धडक दिली. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भाऊ यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भगवान यांना मारहाण केली. घाबरलेले भगवान तेथून पळाल्याने बचावले. आरोपी तेथून पसार झाले. काही वेळानंतर भगवान घटनास्थळी आलेा. तेव्हा भाऊ हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली.

न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षाकडून सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. सरकार पक्षाकडून १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात भाऊ मरगळे यांचे चुलतभाऊ भगवान यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरुन पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा : नग्न अवस्थेत मंदिरात धाव, देवीची मूर्ती उचलली अन् तलावात उडी; महिला इंजिनिअरच्या रहस्यमय मृत्यू!

कोयत्यावर रक्ताचे डाग

आरोपींच्या वकिलांनी भाऊ मरगळे यांचा खून झाला नसून, त्यांचा अपघाती मृत्यू झाला, असा बचाव केला होता. सराकरी वकील राजेश कावेडिया यांनी भाऊ यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा खून करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींकडून कोयता, तसेच रक्ताचे डाग पडलेले कपडे जप्त करण्यात आले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत कोयता आणि कपड्याची तपासणी करण्यात आली. तपासणीत कोयता आणि कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग हे खून झालेल्या व्यक्तीचे नमूद करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष ग्राह्य धरुन आरोपींना शिक्षा सुनावली.

Web Title: Five members of the same family from mulshi have been sentenced to life imprisonment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
1

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
2

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
3

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
4

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.