सिया-Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने...4 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; दोघांनीही कुटुंबियांना ठेवले होते अंधारात
पिंपरी : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून देऊन हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. मात्र, त्यांची ही मुदत गुरुवारी (दि. १६) संपल्याने त्या दोघांना पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या न्यायालयीन चौकशीत वडगाव मावळ सत्र न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ केली आहे.
बांधकाम व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल हिने तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी याच्यासमवेत कट रचून १८ जून रोजी मावळातील लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरुन सुमारे साडेतीनशे फूट खोल दरीत ढकलून हत्या केली होती. या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांची कसून तपासणी केल्यानंतर या घटने प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे उजेडात येत होते.
दरम्यान, गुरुवारी दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार असल्याने दोघांना गुरुवारी दुपारी वडगाव मावळ येथील सत्र न्यायालया समोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयात सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन पुन्हा १४ दिवसांची वाढ केली आहे.
मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती
पुण्यातील केतन हत्याकांडाचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबईतून आणखी एक घटना समोर येत आहे. दोन्ही घटनेत बरेच साम्य आढळले असून, फरक इतकाच की यावेळी मुलाची नाही तर मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरात घडल्याची माहिती असून पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच आरोपीचा अटक केली आहे. मृत मुलगी अल्पवयीन असून प्रियकराकडूनच ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.






