लांजा शहरातून गॅस सिलेंडर चोरीला (फोटो- सोशल मीडिया)
लांजा शहरात गॅस सिलिंडर गेले चोरीला
शहरातील बाजारपेठेत घडली घटना
व्यावसायिकांसमोर निर्माण झाली अडचण
लांजा: लांजा शहरातील बाजारपेठ परिसरातून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन हातगाडी व्यवसायिकांचे गॅस सिलिंडर चोरी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. एकीकडे गॅस सिलिंडरची टंचाई असताना दुसरीकडे मात्र ऐन टंचाईवेळी चोरी झाल्याने संबंधित व्यवसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. लांजा बाजारपेठेमधील दोन हातगाडी व्यवसायिकांच्या गाड्यांवर असलेले गॅस सिलिंडर चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास (Crime) लंपास केले.
यामध्ये चोरी झालेल्या एका व्यवसायिकाची हातगाडी भूमी अभिलेख कार्यालयासमोर असते, तर दुसऱ्या व्यवसायिकाची हातगाडी साई लॉज समोर असते. रविवारी (दि. १५) सकाळी संबंधित व्यावसायिक आपल्या हातगाडीकडे आले असता गॅस सिलिंडर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, लांजा शहरातील बाजारपेठ परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या सिलिंडर चोरीच्या घटनेमुळे संबंधित व्यवसायिक अडचणीत आले असून गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सिलिंडर चोरटे वावरू लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
गॅस तुटवड्याविरोधात वाई तालुका काँग्रेस नेते आक्रमक
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आखाती देशातील युद्धाचे कारण पुढे करून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अन्यायी दरवाढीचा आणि विस्कळीत पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी वाई तालुका काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने काल , सोमवार १६ मार्च २०२६ रोजी वाईत चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.
चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध; गॅस तुटवड्याविरोधात वाई तालुका काँग्रेस नेते आक्रमक
वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधीकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले. नरेंदर सरेंडर, भाजपा सरकारचा जाहीर निषेध, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
भाजीपाला बाजाराला बसला फटका
इराण-इस्रायल युद्धाची झळ आता थेट भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारी कच्च्या मालाची निर्यात पूर्णपणे थांबल्यामुळे, निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक कृषी उत्पादन बाजारात पडून आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असून, भावातही लक्षणीय घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे, वाढत्या भावांमुळे विक्रेते चिंतेत आहेत, कारण ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, केवळ निर्यातबंदीमुळेच नाही, तर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसत आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाल्याच्या पदार्थांचा वापर कमी झाल्यामुळे विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही दुहेरी फटका बसला आहे.






