गोंदिया: गोंदियाच्या रायपूर गाव शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ठेकेदाराला मजुरीचे पैसे मागितले म्हणून हत्या करण्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या परकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि दावनिवाडा पोलिसांनी केला आहे. कापूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (39) व ओमकार चेतराम नेवारे (52) दोन्ही रा. रायपूर जि. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हडपसरमधील जेएसपीएम कॉलेजजवळील घटना
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव हसनलाल पाचे असे आहे. हसनलाल आरोपी कपूरचंद ठाकरेकडे बांधकामावर मजुरीचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक आणि आरोपी ठाकरे यांच्या मजुरीच्या पैशावरून वाद झाला. यामुळे ठाकरे याने हसनलाल याला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात दवनीवाडा पोलीस स्टेशनचच्या पोलीस निरीक्षक वैशाली ढाले करीत आहेत.
चिडविण्याच्या कारणावरून मेंढपाळाला दगडाने ठेचून संपवलं, नंतर
तर अशीच एक धक्कदायक घटना बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात घडली आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचं गूढं उलगडलं आहे.
पोलीस तपासात धक्कदायक माहिती समोर आली आहे. दीपक बिल्ला याची हत्या त्याच्यासोबत मेंढपाळीचं काम करणाऱ्या विलास मोरे या साथीदारानेच केली. सतत चिडवणं आणि बोलण्यातून झालेला राग यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. संतापाच्या भरात विलास मोरे याने दगड उचलून दीपकच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केला. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी विलास मोरे घटनास्थळावरून फरार झाला आहे. तो पाटोदा तालुक्यातील डोंगर शिवारात लपून बसला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. चार दिवसांच्या सततच्या शोधमोहीमेनंतर अखेर पोलिसांच्या हाती तो लागला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
धक्कादायक ! कोयत्याने सपासप वार करून पत्नीची हत्या; नंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या