Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मानवी जीवनाशी खेळ चालणार नाही”; ५० खलाशांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे निर्देश

अरबी समुद्रात अडकलेल्या ५० खलाशांना अमानुष परिस्थितीत जगावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तातडीने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. मानवी जीवनाचे मोल अधोरेखित करत न्यायालयाने कठोर भूमिका घेतली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 10:40 AM
“मानवी जीवनाशी खेळ चालणार नाही”; ५० खलाशांना मुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

“मानवी जीवनाशी खेळ चालणार नाही”; ५० खलाशांना मुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • तीन जहाजांवरील ५० खलाशी अत्यल्प अन्न व फक्त ३०० मिली पाण्यावर जगत होते.
  • उच्च न्यायालयाने अमानुष वागणुकीची दखल घेत तात्काळ सुटकेचे आदेश दिले.
  • जहाजमालकांवर ताशेरे ओढत मानवी जीवनाशी खेळ सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
आयुष्य एकदाच मिळते आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले आणि या वर्षी फेब्रुवारीपासून अरबी समुद्रात ताब्यात असलेल्या तीन जहाजांवरील ५० खलाशांच्या सुटकेचे आदेश राज्य सरकारला दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, ५० खलाशांना न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी, त्यांना तिथे चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले असून समुद्रातील जहाजावर प्रचंड गैरसोयी असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणालाही जहाजावर परतण्याची इच्छा नसल्याचे खलाशांनी खंडपीठाला सांगितले. तसेच जहाजांवर अत्यंत कमी अन्न आणि पाण्यावर जगत होते. त्यांना दररोज फक्त ३०० मिली पाणी मिळत असल्याची आपबिती न्यायालयाला सांगितली. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने निरीक्षण नोंदवत खलाशांना सोडण्याचे निर्देश दिले.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात, महिलेचा मृत्यू; जखमींचा आकडाही आला समोर

मानवी जीवनाशी असे वागणे सहन करणार नाही !

जहाजांच्या मालकांना मानवी जिवाचे मोल नसून त्यांना फक्त त्यांच्या जहाजाची आणि व्यावसायिक कामांची चिंता असल्याचे खडेबोल न्यायालयाने सुनावले. तसेच या कर्मचाऱ्यांना फक्त ३०० मिलीलिटर पाणी कसे देऊ शकता ? आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही दररोज यापेक्षा जास्त पाणी मिळते. मानवी जीवनाशी असे वागणे आम्ही सहन करणार नाही. प्रत्येकाला आयुष्य एकदाच मिळते, असा पुनरुच्चारही न्यायालयाने केला. तसेच न्यायालय मानवी जीवांची काळजी घेईल, जहाजांचे मालक त्यांच्या ताब्यात घेतलेल्या जहाजांची काळजी करू शकतात, अशी टिपण्णी करून न्यायालयाने यलो गेट पोलिसांना ५० खलाशांसंदर्भातील सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांना सोडण्याचे आदेश दिले.

बारामतीत भरदिवसा दरोडा! रिव्हॉल्व्हरच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले; बारामती तालुका पोलिसांकडून टोळीला फिल्मी स्टाईल बेड्या

याचिकेत काय ?

शहरापासून ११ सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात अवैध इंधन तेल आणि डांबराचे हस्तांतरण करताना यलो गेट पोलिसांनी तीन जहाजे ताब्यात घेतली होती.
एमटी अस्फाल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया अशी तिन्ही जहाजांची नावे असून त्यावर ५० अधिक खलाशी अडकले आहेत.
या ५० खलाशांपैकी सात जणांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. फेब्रुवारी महिन्यापासून या जहाजांवर अडकले असून अत्यंत कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह राहत असल्याचा दावा याचिकेत केला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: High court orders release of 50 sailors over inhuman conditions arabian sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Court orders
  • High court
  • Khalistani

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.