फोटो सौजन्य सोशल मिडिया
अग्निशमन विभागाचे प्रमुख अशोक खांडेकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आणखी व्यक्ती दबल्याची शक्यता वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू होते. जालना रोडवरील द्वारकादास श्यामकुमार कपड्याच्या दालनाशेजारी हे बांधकाम सुरू आहे.
गुरुवारी या ठिकाणी छत टाकण्याचे काम सुरू होते. सायंकाळी काम संपल्यानंतर छताला आधार देण्यासाठी विहिरीच्या कठड्यावर उभे केलेले लोखंडी पाइप वाकल्याने छताचा काही भाग कलला. त्यानंतर संपूर्ण छत अचानक कोसळले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचा एक बंब, अधिकारी आणि जवान घटनास्थळी रवाना झाले, रात्री पावणेआठच्या सुमारास जेसीबी, क्रेन आदी यंत्रांच्या मदतीने मलबा हटविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, रात्रीची वेळ आणि काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने बचावकार्यात अडथळे आले. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर मलबा हटविण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
रात्री पावणेआठच्या सुमारास मलबा हटविण्यास सुरुवात झाली, मात्र, अंधार आणि काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने कामात अडथळे निर्माण झाले. वीज आल्यानंतर जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. पाच ते सहा कामगार दबले असण्याची भीती व्यक्त होत असली, तरी अग्निशमन विभागाकडून एक व्यक्ती दबल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी मलबा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत होते. हा मलबा हटवण्यासाठी वेळ लागणार असून मलब्याखाली आणखी कुणी दबलेले आहे का, हे संपूर्ण मलबा हटवल्यावरच कळेल.






