दिल्लीसारखी हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी सुरतमधून (Surat) समोर आली आहे. येथे रात्रीच्या वेळी एका कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली (Car Hits Bike Rider). पत्नी रस्त्यावर पडली तर पती गाडीखाली अडकला. अपघातानंतर पत्नीने पतीला हताशपणे शोधले, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी घटनास्थळापासून १२ किमी अंतरावर पतीचा मृतदेह आढळून आला. ही घटना गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री १० वाजता घडली.
सागर पाटील (२४) (Sagar Patil) पत्नी अश्विनीसोबत (Wife Ashwini) दुचाकीवरून घरी जात असताना बुधवारी रात्री सुरत जिल्ह्यातील पलसाना तालुक्यातील तांतिथिया गावाच्या (Surat District Palsana Talhsil Tantithiya village) हद्दीत एका आलिशान कारने त्यांना धडक (Hits) दिली. अश्विनी रस्त्यावर कोसळली तर दुसऱ्या दिवशी पतीचा मृतदेह सापडला.
[read_also content=”अरे काय हे ? एकानं फ्लाय ओव्हरवरुन भिरकावल्या दहाच्या नोटा, नोटा जमा करण्यासाठी ही गर्दी.. लोकं गाड्या थांबवून मागू लागले पैसे https://www.navarashtra.com/viral/man-throws-bank-notes-off-flyover-its-raining-money-in-bengaluru-video-goes-viral-nrvb-364233.html”]
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, मात्र आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपींचा पत्ता लागला नाही. घटनेच्या दोन दिवसांनंतर एका तरुणाने या प्रकरणी पुढे येऊन हा व्हिडिओ पोलिसांना दाखवला. यातून संपूर्ण घटना उघडकीस आली. याद्वारे पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून कारची खातरजमा केली. आरोपी चालक फरार आहे.
व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाने सांगितले की, तो कामराजच्या कोसमडी गावातून सुरतला येत होता. त्याच्या समोरून एक गाडी जात होती. रस्त्यावर स्पीड ब्रेकरसारखे काहीतरी आले. अचानक एक तरुण गाडीखाली अडकल्याचे त्याने पाहिले. त्याने गाडीचा पाठलाग केला, पण गाडी वेगात होती. त्याने एक व्हिडिओ बनवला. दुसऱ्या दिवशी कळले की एका तरुणाचा अपघात झाला आणि ड्रायव्हरने त्याला ओढत दूरवर नेले. यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला.
[read_also content=”IAS-IPS दाम्पत्याच्या घरी तब्बल 56 कॉन्स्टेबल ड्युटीवर, शूज पॉलिश, कपडे धुण्यापासून ते जमीन पुसण्यापर्यंतचे काम, प्रत्येकाचा सरकारी पगार 50 हजारांच्या घरात https://www.navarashtra.com/india/ias-ips-married-couple-house-shudh-desi-seniors-harassment-56-constable-dutyer-shoes-polish-clothes-washing-to-ground-cleaning-work-each-government-salary-50-thousand-nrvb-364220.html”]
सागरची पत्नी अश्विनी पाटील रुग्णालयात दाखल आहे. ती म्हणाली- आम्ही माझ्या मावशीच्या घरी गेलो होतो. माझा नवरा मला परत घ्यायला आला. रात्री दहाच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून सुरतकडे येत होतो. तेव्हा अचानक गाडीने आम्हाला मागून धडक दिली आणि मी खाली पडले. घाईघाईत आजूबाजूचे लोकही आले. मी रस्त्यात सागरला खूप शोधले, पण अंधार असल्याने तो सापडला नाही.
तिने सांगितले की, दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह घटनेच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावर सापडला होता. माणुसकीच्या नावाखाली या लोकांना आपण दवाखान्यात न्यावे असे वाटलेही नाही. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दोघांनी यापूर्वी प्रेमविवाह केला होता. या संदर्भात आधी कुटुंबात काही भांडण झाले होते, पण कालांतराने दोन्ही कुटुंबांनी ते मान्य केले.
रस्त्यावर घासल्यामुळे तरुणाच्या शरीरातील हाडेही दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाच्या छातीचा काही भागही रस्त्यावर पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर चालक शुद्धीवर आला आणि त्याने भीतीपोटी कार थांबवली नाही. कडोदरा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरात राज्य सरकारच्या पुढाकारातून त्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.