• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp Shiv Sena Got Equal Votes Political Conflict Will Intensify In Future

Sillod ZP Election Result 2026: भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

डोंगरगाव गटातून देवदास माणिकराव पालोदकर हे शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. पालोदकर परिवाराने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद दहा वर्ष भूषवलेले आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 13, 2026 | 03:35 PM
Chhatrapati Sambhajinagar Politics, ZP Election Result 2026,

भाजप-शिवसेनेला मिळाली समान मते; भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शिवसेना व भाजपमध्ये जोरदार लढती
  • भाजप व शिवसेनेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कडवा संघर्ष
  • घाटनांद्रा गटातील जागा हारणे भाजपसाठी क्लेशदायक
 
Sillod ZP Election Result 2026: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शिवसेना व भाजपमध्ये जोरदार लढती बघावयास मिळाल्या. काही प्रतिष्ठेच्या जागावर शिवसेनेने तर काही ठिकाणी भाजपने विजय मिळवला विधानसभा मतदारसंघाचा विचार करता दोन्ही पक्षांना समान मते मिळाली हे विशेष. कितीही टीका होत असली तरी दोन्ही पक्षात घराणेशाही खोलवर रुजलेली असून त्याचा प्रत्यय जिल्हा परिषद निवडणुकीत पहावयास मिळाला, विधानसभा मतदारसंघात भाजपला ११ जिल्हा परिषद गटामधून एक लाख १४ हजार ९५० मते मिळाली तर शिवसेनेला एक लाख १४ हजार ९२ मते मिळाली.

राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप व शिवसेनेत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कडवा संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीपासून या संघर्षांची धार आणखीनच टोकदार झाली व त्याचे पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत देखील बघावयास मिळाले. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील दुराव्यांच्या बातम्या आल्यावर गेल्या दोन वर्षात हे दोन नेते अनेकदा एकमेकावर टीका करताना दिसले.

गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी

जिल्हा परिषद गटांचा विचार करता अजिंठा जि. प. गटात सुरुवातीपासूनच भाजपने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने ही जागा सहज जिंकली. शिवना जि प. गटातील निकाल भाजपसाठी धक्कादायकच होता. निकिता राजेंद्र काळे विरुद्ध बेबीताई अरुण काळे अशा लढतीत निकिता काळे यांनी बाराशे पाच मतांनी विजय मिळवत भाजपला धक्का दिला.

घाटनांद्रा, शिवणा येथे भाजपला धक्का

ठंडणगावची जागा भाजपने सहज जिंकली प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता बनकर या पंचायत समितीसाठी उभे राहिल्याने सुरेश बनकर यांनी तिन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या, अंभई गटात भाजपने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही व आमदारांचे चिरंजीव अब्दुल आमेर यांनी साडेतीन हजार मतांनी विजय मिळवला.

घाटनांद्रा गटातील जागा हारणे भाजपसाठी क्लेशदायक आहे. माजी सभापती व भाजपचे तालुक्यातील प्रमुख नेते अशोक गरुड यांच्या कन्येचा या ठिकाणी पराभव झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्या पत्नी आशा गाढे यांनी जागा अठराशे मतांनी जिंकली. शिवसेनेच्या (उबाला) गटाच्या निशा रविंद्र बिलवाल यांनी ४७२१ मते घेऊन चांगली लढत दिली. भराडी जिल्हा परिषद गटात शिवसेना व भाजप दोन्ही पक्षाकडून नवखे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मराठा आरक्षण आंदोलनातून सक्रिय झालेले सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे यांनी भाजप तर्फे उमेदवारी मिळवत साडेतीन हजार मतांनी विजय मिळवला.

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; 

डोंगरगाव गटातून देवदास माणिकराव पालोदकर हे शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. पालोदकर परिवाराने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद दहा वर्ष भूषवलेले आहे.  माणिकदादा पालोदकर पाच वर्षे व प्रभाकरराव पालोदकर यांनी पाच वर्षे यांनी अध्यक्ष पद भूषवले.

तिसऱ्यांदा जिंकली जि. प. निवडणूक

अंधारी जिल्हा परिषदेची जागा मंगल केशवराव तायडे यांनी जिंकली.
मंगल तायडे या गटातून दुसऱ्यांदा विजयी झाल्या असून त्यांचे पती केशवराव तायडे यांनी या गटातून एकदा विजयी होत
जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मिळवले होते.
त्यांनी महानंदा ज्ञानेश्वर तायडे यांचा पराभव केला शिवसेनेच्या (उबाठा) लता दादाराव वानखेडे यांनीही तेवीसशे मते घेत लढत दिली.
केन्हाळा जि. प. गटात शिवसेनेच्या वतीने उभ्या राहिलेल्या डॉ विजया जाधव यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत जोरदार लढत दिली.
भाजपच्या अनिता ज्ञानेश्वर मोठे यांनी तिसऱ्यांदा जिल्हा परिषद निवडणूक जिंकली.
त्यांचे पती ज्ञानेश्वर मोठे यांनीही एकदा या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा गट पूर्वी भवन जि. प. गट नावाने ओळखला जात होता.

माहीन मुलतानी सर्वात तरूण सदस्य

भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इंद्रीस मुलतानी यांच्या कन्या माहीन मुलतानी यांनी फर्दापूर जि. प. गटातून विजय मिळवला असून त्या जिल्ह्यातील सर्वांत तरुण (२१) जिप सदस्या ठरल्या आहेत. त्यांच्या खालोखाल शिवना जि प गटातील निकिता राजेंद्र काळे (२३) यांचा क्रमांक लागतो.

सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात सेनेला – ६, भाजपला ५ जागा

सिल्लोड तालुक्यात शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या ६ जागा व पंचायत समितीच्या ८ जागा मिळाल्या तर भाजपाला जिल्हा परिषदेच्या ३ व पंचायत समितीच्या १० जागा मिळाल्या. विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ११ जागांपैकी शिवसेना सहा भाजपच्या पाच अशी विभागणी झाली तर सोयगाव व सिल्लोड या दोन्ही पंचायत समितीवर भाजपने ताबा मिळवला.

Web Title: Bjp shiv sena got equal votes political conflict will intensify in future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?
1

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
2

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली
3

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात
4

“तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा ते निष्ठावंत…; मुस्लीम महापौरवरुन टीका करणाऱ्या शिदेंवर संजय राऊतांचा घणाघात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन्स डेला ‘द बॉडी शॉप’कडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन्स डेला ‘द बॉडी शॉप’कडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

Feb 13, 2026 | 05:15 PM
Triyugi Narayan Temple : अक्षया-विशालचे विवाहस्थळ का आहे विशेष? त्रियुगीनारायण म्हणजे प्रेमाचे मंदिर

Triyugi Narayan Temple : अक्षया-विशालचे विवाहस्थळ का आहे विशेष? त्रियुगीनारायण म्हणजे प्रेमाचे मंदिर

Feb 13, 2026 | 05:09 PM
Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”,  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Feb 13, 2026 | 05:07 PM
AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

Feb 13, 2026 | 04:56 PM
Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Feb 13, 2026 | 04:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.