Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात जन्या वादातून तरुणावर हल्ला; कुर्‍हाड अन् कोयत्याने सपासप वार

वारजे परिसरात जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने कोयते तसेच कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 23, 2024 | 12:55 PM
पुण्यात जन्या वादातून तरुणावर हल्ला; कुर्‍हाड अन् कोयत्याने सपासप वार

पुण्यात जन्या वादातून तरुणावर हल्ला; कुर्‍हाड अन् कोयत्याने सपासप वार

Follow Us
Follow Us:

पुणे : वारजे परिसरात जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने कोयते तसेच कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत देखील माजवली. दोन दिवसांपुर्वी रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भैय्या उर्फ लक्ष्मण शेडगे याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत जुबेर शेख (वय २२) याने तक्रार दिली आहे. हल्यात अक्षय कांबळे (वय २८) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुासर, जुबेर व अक्षय मित्र असून, ते आणि काही मित्र रात्री म्हाडा वसाहतीसमोर शेकोटी करून बसलेले होते. दरम्यान, यातील आरोपी व तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अक्षय कांबळे व आरोपींमध्ये जुने वाद होते. वादानंतर आरोपींच्या मनात राग होता. तक्रारदार व अक्षय शेकोटी करून तापत बसले असताना टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी कोयते व कुर्‍हाडीने अक्षय याच्यावर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करत तेथे गोंधळ घालत आरोपी पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; टेम्पो अडवून 18 लाखांचा गुटखा पकडला

दोन तरुणांवर कोयत्याने वार

गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: In pune an incident of an attack on a young man has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 12:51 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
3

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
4

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.