प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे तांडव : स्थानिक नागरिकांचे आरोप
Pune News: अनेक वर्ष जुना पूल असल्यामुळे पुलाची दयनीय अवस्था झाली होती. पूल कमकुवत झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी नवीन पुल बांधण्यासंदर्भात प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले. आज हाच पूल पडून अनेकांचा जीव गेला तरी अनेकांना आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. या दुर्घटनेस प्रशासनच जबाबदार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले. दरम्यान, कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे शेलारवाडी आणि कुंडमळा या गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. या ग्रामस्थांना शेतीचे साहित्य आणण्यासाठी किंवा लोकलने प्रवास करण्याकरिता देहूगाव किंवा तळेगाव येथून तब्बल आठ ते दहा किलोमीटरचा वळसा घालून ये – जा करण्याची वेळ आली आहे.
आजू बाजूच्या ग्रामस्थांची होणार अडचण
रांजणखळग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर सुमारे ३० वर्षांपूर्वी लोखंडी पूल बांधण्यात आला होता. पूल काहीसा कमकुवत झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्याला सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्यात आला होता. पावसाळ्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने कुंडमळा येथे पर्यटक येतात. केदारवाडी येथील ग्रामस्थ शेतीसाठीची खते अवजारे खरेदी करण्यासाठी इंदोरी येथे जावे लागते. तर, कुंडमळा येथील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांना पुण्यात जाण्यासाठी लोकलने प्रवास करण्याकरिता बेगडेवाडी किंवा तळेगाव रेल्वे स्टेशन येथे जावे लागते. मात्र पूल कोसळल्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागणार आहे. आठ ते दहा किलोमीटरचा वळसा घालून या नागरिकांना देहूगाव किंवा तळेगाव मार्गे ये जा करावी लागणार आहे.
Monsoon Update: मुुंबई-पुण्यासह राज्यभरात कोसळधार; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार
जखमी व्यक्तींना पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीस बाहेर काढण्यात आले. सदर बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे / पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) चे अग्निशमन दल व स्थानिक बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी उपस्थित आहे.
इंद्रायणी नदीवरील हा पूल 1995 मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेला आहे. या पुलाला जोडणारा जिल्हा परिषदेचा चार किलोमीटर रस्ता इंद्रायणी नदीपर्यंत आहे. तत्कालीन सहाय्यक अभियंता आणि जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डनुसार या पुलाचे कोणतेही बांधकाम जिल्हा परिषदे कडून झालेली नाही.
-चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, पुणे
Daund-Pune Demu Train Fire: दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये टॉयलेटला आग; शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज
प्रशासनाकडून दुर्लक्ष ….
अनेक वर्ष जुना पूल असल्यामुळे या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. पूल कमकुवत झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी नवीन पुल बांधण्यासंदर्भात प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार स्थानिक तरुण महेश शेलार यांनी केली.
पुलाचा सांगाडा उचलण्याचे आव्हान…
लोखंडी पुलाचा संपूर्ण सांगाडा नदीत कोसळला आहे. पुलावर दुचाकी तसेच चालत असणारे अनेक पर्यटक नदीत कोसळले. काही पर्यटक या पुलाच्या सांगड्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी चार मोठे क्रेन बोलावून सांगाडा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीचे पाणी, पत्रातील खडक आणि जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे पुलाचा सांगाडा जाग्यावरून बाजूला करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
नातवाईकांचा आक्रोश….
कुंडमळा येथे वर्षा सहलीसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब आले होते. यातील अनेक नागरिक आपली पत्नी, मुलांना चांगला निसर्ग दाखविण्यासाठी दुचाकीवर घेऊन नदीच्या पुलावर गेले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक फोटो काढत होते. त्यातच अचानक पूल कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. पूल कोसळल्याचे पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. माझा मुलगा, सून, नातू पुलावर होते. ते खाली पडले आहेत. अजून सापडले नाहीत, त्यांना सापडावा, त्यांना वाचवा, अशी आर्त हाक नातेवाईक पोलिसांना देत होते.
Todays Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या किंमतीत झाली घसरण, काय आहेत आजचे भाव?
दुर्घटनेपुर्वी पुलावर दोन गटात वाद…
कुंडमळा आणि शेलारवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या नदी पात्रावर लोखंडी पुल आहे. आज दुर्घटना घडण्यापूर्वी दोन्ही बाजूने पुलावर दुचाकीस्वार घुसले होते. त्यामुळे पुलावर गर्दी होऊन अडका अडकी झाली. यावेळी दुचाकी मागे घेण्यावरून दोन गटात वादावाद सुरु होती. त्यावेळीच ही दुर्घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
कोसळलेल्या पुलाचा मालक कोण ?
हा पूल १९९५ मध्ये पादचाऱ्यांसाठी उभारला गेला. तो सध्या वाहतुकीसाठी बंद होता. मात्र, त्या पुलावर पर्यटक गेले. त्यातून मोठी दुर्घटना घडली आहे. हा पूल नेमका कोणाच्या मालकीचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि त्यावरील पुलांची निर्मिती ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाते. मात्र, या दोन्ही यंत्रणांनी कोसळलेला पूल आमचा नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे या पुलाचा मालक कोण असा प्रश्न उस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, कोसळलेला पूल ज्या रस्त्यावर आहे. तो जिल्हा परिषदेचा आहे, त्यावर आम्ही पूल कसा उभारणार, असा प्रश्न करत आमच्या विभागाचा काही संबंध नाही, असे सष्ट केले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंतकुमार चौगुले यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, हा पूल जिल्हा परिषदेचा नाही, असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले. त्यामुळ या दोन्ही विभागाचा हा पूल नसेल, तर मग या पुलाचा मालक कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.