काय घडलं नेमकं?
चेतन दिलीप जंगले असे पीडित तरुणाचे नाव आहे. चेतनने आपल्याच समाजातील धनश्री पाटील या तरुणीशी नाशिक पंचवटी येथे जाऊन प्रेम विवाह केला होता. मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या लोकांना मान्य नव्हता. लग्नानंतर चेतन हा धनश्री सोबत त्याच्या नातेवाईकांकडे आल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी खडका गावात जाऊन चेतन जंगले सह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी त्याला नग्न करून गावात धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर नग्न करून खांबाला बांधून मारहाण केली. बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर गावातील काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका केली. त्यामुळे अनर्थ टळला.
तरुणाचा हात फॅक्चर
त्याच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा हात फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या दहा बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१९ मार्च रोजी लग्न
चेतन आणि धनश्रीने नाशिक येथे १८ मार्च २०२६ रोजी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते. २० मार्च रोजी तरुणीचे नातेवाइक व इतर १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत पळवून नेले. त्यांनतर मारहाणीची घटना घडली.
Mumbai Crime: दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक
Ans: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ही घटना घडली.
Ans: तरुणाने प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी हा हल्ला केला.
Ans: 10-12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 5 जणांना अटक करण्यात आली.






