murder (फोटो सौजन्य : pinterest)
जळगावमध्ये खळबळजनक घटना घडल्याचं समोर आले आहे. सासरच्यांनी भरस्त्यावर जावयाला निर्घृणपणे संपवलं. जळगावमध्ये जावयावर भर रस्त्यात हल्ला करत हत्या करण्यात आली. आकाश पंडित भावसार असे मृत व्यक्तीचा नाव आहे.
Pune News : गुन्हेगारी कमी होणार! पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजना सुरु
कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणावर हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत. जळगाव शहरात घडलेल्या या भयंकर घटनेने एकाच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कौटुंबिक वादातून पत्नीच्याच नातेवाईकांनी तरुणावर हा हल्ला करत त्याची हत्या केली आहे. जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आकाश आणि त्याच्या पत्नीचे कौटुंबिक वाद होते. या वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी आकाशला रस्त्यावर गाठत त्याच्यावर धारधार शास्त्राने हल्ला केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशला जिल्हा शासकीय वैधकीय महाविद्यालयात हलवले आहे. या प्रकरणात चार संशयितांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकाच खळबळ उडाली आहे.
अकोल्यात पतीने पत्नी व तीन वर्षांच्या चिमुरडीचा घेतला जीव
अकोला शहरात धक्कादायक दुहेरी हत्याकांडाची बातमी समोर आली आहे. या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्याच्या रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या एक तरुणाने आधी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्याने तीन वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर स्वतः पत्नी आणि मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आहे.
शेतीच्या वादातून महिलेवर कोयत्याने वार; लाथाबुक्क्यांसह डोळ्यात मिरचीपूडही भिरकावली