Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग…; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

संगम डॉट कॉम या मेट्रोमनी साईटवरून पुण्यातील तरूणीशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण करणार्‍या व ४५ लाख रूपये उकळणार्‍या काश्मिरी तरूणाला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2025 | 11:48 AM
लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग...; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवत शारिरिक संबंध ठेवले, मग...; काळेपडळ पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : संगम डॉट कॉम या मेट्रोमनी साईटवरून पुण्यातील तरूणीशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण करणार्‍या व ४५ लाख रूपये उकळणार्‍या काश्मिरी तरूणाला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला मध्यप्रदेशातील इंदोर येथून पकडण्यात आले आहे.

अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जि. जम्मू काश्मिर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षीय तरूणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक विलास सुतार व त्यांच्या पथकाने केली आहे.

अमन मुळचा जम्मू काश्मिर येथील आहे. त्याने सोशल मिडीयावरील अथका मेट्रोमनी साईटवर बनावट आयडी तयार करून खाते उघडले होते. त्यामाध्यमातून तो वेगवेगळ्या शहरातील महिला व तरूणीशी मैत्री करत होता. यातूनच तो त्यांच्याशी जवळीक निर्माण करून आपल्या जाळ्यात ओढत होता. नंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात रकमा उकळत होता.

दरम्यान पुण्यातील एका तरुणीला देखील त्याने अश्याच प्रकारे फसवले होते. फसवणूक झाल्यानंतर तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तरुणीशी शारीरिक संबंध बनवून त्याने तिच्याकडून ४५ लाख उकळले होते. तिला फसवून तो पुण्यातून पसार झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपी अमनचा माग काढत होते. तांत्रिक माहितीत तो मध्यप्रदेशात पळून गेला असल्याचे समजले.

सखोल माहिती घेताना तो मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहरात असल्याचे समोर आले. नंतर पथकाने त्याला इंदोर येथे जाऊन ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या पोलीस कोठडीचा मागणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्यावर दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर अशा विविध ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याच माहिती समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड; ‘या’ भागात गुन्हेगाराने नशेत वाहने फोडली

उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

Web Title: Kalepadal police has arrested the accused who cheated women nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
1

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
2

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
3

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
4

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.