Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak News: मासिक पाळीतील वेदना ठरल्या जीवघेण्या; 19 वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, कर्नाटक येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना

कर्नाटकातील तुमकुरू येथे मासिक पाळीतील तीव्र पोटदुखी व वेदनांना कंटाळून 19 वर्षीय कीर्तना हिने आत्महत्या केली. दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक व मानसिक वेदना दुर्लक्षित राहिल्याने एका तरुणीचं आयुष्य संपलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 14, 2026 | 01:59 PM
crime(फोटो सौजन्य- social media)

crime(फोटो सौजन्य- social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 19 वर्षीय कीर्तना मासिक पाळीतील तीव्र वेदनांनी त्रस्त होती
  • एकटी असताना असह्य वेदनेतून तिने आत्महत्या केली
  • महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षाचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामागचं कारण म्हणजे मासिक पाळीत होणार त्रास. ही घटना कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव कीर्तन असे आहे.

Bhandara Crime: संपत्तीच्या लालसेपोटी जावयानेच सासऱ्याचा घेतला जीव, मृतदेह पुलाखाली लपवला आणि… ; भंडारा येथील घटना

काय घडलं नेमकं?

कलबुर्गीच्या सलहल्लीची राहणारी कीर्तना नोकरीच्या शोधात दोन महिन्यांपूर्वी मामाच्या घरी आली होती. काम न मिळाल्याने ती तिथंच राहत होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तना गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर पोटदुखी आणि मासिक पाळीतील वेदनेमुळे त्रस्त होती. या वेदना इतक्या तीव्र होत्या की ती दिवसाचं नियमित कामही करू शकत नव्हती. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरात कुणीच नव्हतं. एकटेपणा आणि असहाय्य वेदनेत तिने स्वत:चा जीव घेतला. कीर्तनाने आत्महत्या केल्याचे कळताच कुटुंबाला धक्काच बसला.

पोलीस तपास सुरु
कीर्तनाच्या आत्महत्येबाबत कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. नौकरी आणि चांगल्या करिअरच स्वप्न कीर्तना पाहत होती. यादरम्यान तिने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केलं जात आहे.

आजही सामान्य समजून दुर्लक्ष
आजही मासिक पाळी बद्दल खुलेपणाने बोललं जात नाही. मुली आजही मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासाला व्यक्त करत नाही. अनेक महिला या त्रासाला सामान्य समजून दुर्लक्ष करतात मात्र हा त्रास जीवघेणा ठरू शकतो. जास्त त्रास झाल्यास डॉक्टरशी संपर्क करावे आणि योग्य ते उपचार घ्यावे.

कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकातील तुमकुरू येथे ही दुर्दैवी घटना घडली.

  • Que: कीर्तनाच्या मृत्यूचं कारण काय?

    Ans: मासिक पाळीतील तीव्र पोटदुखी व दीर्घकालीन वेदना हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे.

  • Que: या घटनेतून कोणता प्रश्न अधोरेखित होतो?

    Ans: महिलांच्या आरोग्य समस्यांकडे, विशेषतः मासिक पाळीतील वेदनांकडे होणारं दुर्लक्ष.

Web Title: Karnatak newsmenstrual pain proved fatal a 19 year old girl ended her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • crime
  • karnatak news
  • Periods

संबंधित बातम्या

Bhandara Crime: संपत्तीच्या लालसेपोटी जावयानेच सासऱ्याचा घेतला जीव, मृतदेह पुलाखाली लपवला आणि… ; भंडारा येथील घटना
1

Bhandara Crime: संपत्तीच्या लालसेपोटी जावयानेच सासऱ्याचा घेतला जीव, मृतदेह पुलाखाली लपवला आणि… ; भंडारा येथील घटना

Beed Crime: मुलगा नाही म्हणून विवाहितेचा छळ; बीडमध्ये तीन मुलींच्या आईची आत्महत्या
2

Beed Crime: मुलगा नाही म्हणून विवाहितेचा छळ; बीडमध्ये तीन मुलींच्या आईची आत्महत्या

Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू
3

Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत
4

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.