बंगळुरू : हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आथा वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर, धमकी देणाऱ्या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे(Know where to go for a morning walk! Threats to judges ruling in hijab case).
तिरुनेलवेली येथे कोवई रहमतुल्लाला अटक करण्यात आली, तर 44 वर्षीय एस जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजावरमध्ये ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने हिजाब प्रकरणी निर्णय देताना वर्गात हिजाब घालण्यावर घातलेली बंदी कायम ठेवली आहे.
सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करीत न्यायाधीशांना धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच कर्नाटकातील वकील एस. उमापथी यांनी तात्काळ हायकोर्टाच्या रजिस्टारला ही बाब लक्षात आणून दिली. उमापथी यांना हा धमकीचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर मिळाला. ज्यात आरोपी खुलेआम मुख्य न्यायाधीश अवस्थी यांना धमकी देताना दिसत आहे. तुम्ही मॉर्निंग वॉकला कुठे जाता हे लोकांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या परिवारासोबत उडीपी मठात गेला होतात असं म्हणत या आरोपीने अवस्थी यांनी दिलेल्या निकालाबाबत अश्लील शब्दांमध्ये टीका केली आहे. झारखंडमध्ये एका न्यायाधीशाची मॉर्निंग वॉकला जाताना हत्या करण्यात आली होती, या घटनेचा उल्लेखही आरोपीने व्हिडीओत केल्याचे उमापथी यांनी सांगितले.
या घटनेनंतर आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. दरम्यान, न्यायाधीशांना मिळालेल्या धमकी प्रकरणाबद्दल डी.जी. आणि आय.जी. यांना विधानसौधा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]