Photo Credit- Team Navrashtra शेताच्या बांध्याजवळ लिंबू-नारळ, बाहुल्या; जादूटोण्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ
सदर महिलेच्या घराबाहेर विचित्र स्वरूपाचे साहित्य ठेवलेले होते. त्यांच्या बकऱ्याचे डोके आणि चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर टांगलेले होते. त्यावर लिंबू, टाचण्या आणि सुया टोचलेल्या होत्या. दरवाजाजवळ तीन नारळांवर काळ्या बाहुल्या बांधून त्यावरही टाचण्या टोचलेल्या होत्या. २१ अर्धवट कापलेले लिंबू, मिरच्या, काट्यांची फांजर, मोडलेली फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळद, कुंकू आणि गुलाल यांचा वापर त्या ठिकाणी झालेला दिसून आला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.