Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवैध पार्किंग करणाऱ्यांना हाळुंगे वाहतूक विभागाचा दणका; पाच महिन्यांत तब्बल…

औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात महाळुंगे वाहतूक विभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 12:30 AM
अवैध पार्किंग करणाऱ्यांना हाळुंगे वाहतूक विभागाचा दणका; पाच महिन्यांत तब्बल...

अवैध पार्किंग करणाऱ्यांना हाळुंगे वाहतूक विभागाचा दणका; पाच महिन्यांत तब्बल...

Follow Us
Follow Us:

चाकण : औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात महाळुंगे वाहतूक विभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागाने विविध नियमभंग प्रकरणांमध्ये एकूण ३ हजार १५४ वाहनचालकांवर कारवाई करत २८ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 

महाळुंगे वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि नामांकित कंपन्या असल्याने जड-अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. अनेक वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला अवैधरित्या पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडी वाढण्याबरोबरच अपघातांचा धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला अवैधरित्या पार्क केलेल्या जड-अवजड तसेच इतर वाहनांवर १ हजार ११७ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतून १४ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन

तसेच, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २ हजार ३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून १४ लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय मॉडिफाइड सायलेन्सर असलेल्या बुलेट मोटारसायकली, नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने, ब्लॅक फिल्मचा वापर करणारी वाहने तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

नियमांविषयी जनजागृती करणे आवश्यक

वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते अपघातांना आळा घालणे आणि वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे महाळुंगे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी सांगितले. नियमभंग करणाऱ्यांविरोधातील कारवाई आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

पाच महिन्यांतील कारवाईचा आढावा

अवैध पार्किंग प्रकरणे : १,११७
अवैध पार्किंग दंड : १४,३१,५००
फॅन्सी नंबर प्लेट कारवाई : २,०३७
फॅन्सी नंबर प्लेट दंड : १४,२१,५००
एकूण कारवाई : ३,१५४
एकूण दंड : २८,५३,०००

Web Title: Mahalunge traffic department has taken action against vehicle owners who park illegally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • No Parking
  • Traffic News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
2

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
3

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
4

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.