Crime News Live Updates
वेल्हा तालुक्यातील गावात पर्यटनासाठी आलेल्या तरुणाच्या खूनाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पान स्टॉलवर आल्यानंतर तत्कालीक कारणावरून त्या तरुणाचा पाच जणांनी खून केल्याची माहिती, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली. कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी पाच दिवसात यातील आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकाश सुभाष भिसे (वय २१, रा. परभणी), भागवत मुंजाजी आसुरी (वय २०), रितेश उत्तम जोगदंड (वय २१), उमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१) व पांडूरंग भानुदास सोनवणे (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. घटेत रोहिदास काळुराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. वेल्हे) असे खून जालेल्या तरूणाचे नाव आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वेल्हा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ व त्यांच्या पथकाने केली आहे.
20 Jun 2025 04:06 PM (IST)
संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १६० किलोमीटरचा तर ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा ६५ किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली. आषाढी वारी सोहळ्यास सुरूवात झाली असून, पुण्यानंतर जिल्ह्यातून हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांनी चोख नियोजन केले आहे.
20 Jun 2025 02:57 PM (IST)
चंदननगरमधील मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी १६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुखदेव विट्ठल साकोरे (वय ६३, रा. शिवशक्ती चौक, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून १६ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.
20 Jun 2025 02:57 PM (IST)
कोंढव्यात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला कोंढवा परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या १६ जून रोजी सायंकाळी बाहेर पडल्या होत्या. तेव्हा चोरट्यांनी कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून २ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
20 Jun 2025 02:57 PM (IST)
वाघोली भागात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्याने दरवाज्यावर ठेवलेली चावी घेऊन कुलूप उघडले आणि चोरी केली. चोरटा माहिती असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
20 Jun 2025 02:41 PM (IST)
झालेली उधारी देण्यासाठी आईकडे पैसे मागितल्यानंतर आईने पैसे देण्यास नकार दिला. आईने नकार दिल्यानंतर मात्र, चिडलेल्या मुलाने आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कसबा पेठेत ही घटना घडली असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंभो राजु सुर्यवंशी (वय २९) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत वहिणीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये ५४ वर्षीय महिलेला मारहाण झाली आहे.
20 Jun 2025 01:02 PM (IST)
प्रवासी घेऊन निघालेली एसटी बस बंद पडल्यानंतर चालक अन् वाहकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवले व स्वत: बसमध्ये झोपले. मात्र, चोरट्यांनी या बंद पडलेल्या बसमधील डिझेल चोरी करून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसटी बसचालक रमेश पोटभरे (वय ५२, रा. एसटी कॉलनी, पुणे-सातारा रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 Jun 2025 12:06 PM (IST)
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा आठवडा विमान कंपन्यांसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. अमहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक बिघाड, सुरक्षा धोक्यांसह विविध कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत किंवा वळवली जात आहेत. या सगळ्यात, एअर इंडियाने शुक्रवारी ८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत. उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनने देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत. एअरलाइनने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने या उड्डाणे रद्द केली आहेत.
20 Jun 2025 11:25 AM (IST)
नणंदेच्या छळामुळे आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासह पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ पतीला अटक केली. तर, नणंदेसह सासूवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे ही घटना बुधवारी दळवीनगर येथील कल्पकसृष्टी या सोसायटीत घडली होती. दरम्यान, आत्महत्येपुर्वी तिने सुसाईड नोट लिहून नणंदेच्या त्रासामुळे मी हा निर्णय घेतल्याचे म्हंटले होते. सुसाईड नोट लिपिस्टीकने लिहीली होती.
20 Jun 2025 11:06 AM (IST)
मिरजमधील मंगळवार पेठेत चर्चजवळ पूर्ववैमनस्यातून बुधवारी (दि. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी सलून दुकानाची तोडफोडही केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मिरज पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश तानाजी कलगुटगी, चेतन सुरेश कलगुटगी, सूरज कोरे व अन्य चार साथीदारांचा समावेश आहे. सर्वजण मिरजचे रहिवासी आहेत. याप्रकरणी रोहन संजय कलगुटगी याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
20 Jun 2025 11:05 AM (IST)
अमरावतीच्या सुफियाननगर परिसरात एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सनोबार सबा अनिस खान (वय 25) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार, पोलिसांकडून आता तपास केला जात आहे.






