दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 214 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs SA 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफक गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत क्विंटन डी कॉकच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर 4 बाद 213 धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी धावा कराव्या लागणार आहेत. भारताकडून वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : फुटबॉल मैदानाला दंगलीचे रूप! बघता बघता पाकिस्तानी खेळाडूंमध्ये तूफान हाणामारी; पहा Video
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. क्विंटन डी कॉक आणि रिजा हेंड्रिंक्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात दमदार झाली. या वेळी क्विंटन डी कॉक चांगलाच आक्रमक दिसून आला. डी कॉक आणि हेंड्रिंक्स यांनी पहिल्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. हेंड्रिंक्स 8 धावा करून माघारी गेला. त्याला वरुण चक्रवर्तीने माघारी पाठवले. त्याच्यानंतर क्विंटन डी कॉकने मैदानात आलेल्या एडन मार्करामसोबत 83 धावांची भागीदारी रचत संघाला मजबूत स्कोअरकडे पोहचवले.
नंतर मार्कराम 26 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. त्यानंतरही क्विंटन डी कॉकने आपला आक्रमक खेळ खेळत राहिला आणि त्याने अर्धशतक पूर्ण केले. मार्करामनंतर देवाल्ड ब्रुविस मैदानात आला पण तो काही खास करू शकला नाही. तो 14 धावा करून बाद झाला. नंतर डी कॉकही 46 चेंडूत 90 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. तो धावा बाद झाला. त्यानंतर डोनोवन फरेरा(नाबाद 30 धावा) आणि डेव्हिड मिलर(20 धावा) यांनी अभेद्य 53 धावांची भागीदारी रचत संघाला 213 पर्यंत पोहचवले. भारताकडून वरुण च्रकवर्तीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.
दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग ११
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, देवाल्ड ब्रुविस, डोनोवन फरेरा, मार्को जानसेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, जॉर्ज लिंडा, रिजा हेंड्रिंक्स
बातमी अपडेट होत आहे…..






