Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; सहा साक्षीदारांनी नोंदवली साक्ष, आता…

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2026 | 12:09 PM
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; सहा साक्षीदारांनी नोंदवली साक्ष

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; सहा साक्षीदारांनी नोंदवली साक्ष

Follow Us
Follow Us:

पुणे : नसरापूर येथील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायालयात सहा साक्षीदारांनी साक्ष नोंदवली आहे. त्यामध्ये पीडितेची आई, वडील, पीडितेच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला पीडितेसमवेत पाहणाऱ्या साक्षीदारांचा समावेश आहे. दरम्यान, आरोपीविरोधात दाखल आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याचे कलम वाढविण्याचा अर्ज सरकार पक्षातर्फे करण्यात आला.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या सहा साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर नोंदविली; तर बचाव पक्षातर्फे अॅड. हिंमतराव सुर्यवंशी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली.

पीडितेच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करणारा पंचनामा (इन्क्वेस्ट पंचनामा), साक्षीदारांना बजावलेले समन्स आणि त्यांचे जबाब, एफआयआरची प्रत, पीडितेचा जन्मदाखला आदी कागदपत्रे सरकार पक्षातर्फे न्यायालयासमोर सादर करण्यात आली; तसेच छायाचित्रे, घटनास्थळावरील सीसीटीव्हीतील चित्रीकरण आदी महत्त्वाचे पुरावे मांडण्यात आले. इन्क्वेस्ट पंच, या प्रकरणातील तक्रारदार असलेली पीडितेची आई आणि वडील यांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

आरोपीने पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिचा शोध घेणाऱ्या तीन ग्रामस्थांनीही न्यायालयासमोर साक्ष नोंदवली. सीसीटीव्ही चित्रीकरणात पीडितेला घेऊन जाणाऱ्या आरोपीला साक्षीदारांनी ओळखले. यापैकी दोन साक्षीदारांनी पीडितेला आरोपीसमवेत बघितल्याचे न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणातील सहाव्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया आज (शनिवारी) सुरू राहणार आहे.

नसरापूर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष न्यायालयाने दररोज सुनावणी घेऊन खटला जलदगतीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरोधात आरोप निश्चित झाल्यानंतर दररोज साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणीची प्रक्रिया होणार आहे. लवकरात लवकर हा खटला निकाली काढून पीडितेला न्याय आणि समाजात योग्य संदेश देण्यात येईल.

– अॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील

Web Title: Major update in nasrapur case six witnesses record their statements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Nasrapur Case
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा
1

Pune Draft Electoral Roll Update: पुणे जिल्ह्यातील २८.६६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचे नाव आहे का? असे तपासा

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
2

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
3

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
4

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.