Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान-साहिल दोषी, आता शिक्षेपूर्वी दोघांची अवस्था चर्चेत

निळा ड्रम, त्यात लपवलेला मृतदेह आणि देशभर गाजलेलं हत्याकांड... मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना न्यायालयाने दोषी ठरवलं. मात्र, निकालापूर्वी कारागृहात दोघांच्या वर्तनात मोठा बदल दिसून आला आहे; मुस्कान मुलीला भेटण्यासाठी विनंती करत आहे, तर साहिलने सहकैद्यांशी बोलणेच बंद केले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 04:15 PM
Crime News: ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान-साहिल दोषी, आता शिक्षेपूर्वी दोघांची अवस्था चर्चेत

Crime News: ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा निकाल; मुस्कान-साहिल दोषी, आता शिक्षेपूर्वी दोघांची अवस्था चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान-साहिल दोषी
  • सौरभची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला
  • मुस्कान मुलीला भेटण्यासाठी अस्वस्थ; साहिल शांत 
 

मेरठ : देशभर चर्चेत आलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. दोघांनी मिळून सौरभची हत्या केल्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आले होते. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही दोषी अस्वस्थ आणि तणावाखाली असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.

मुलीला भेटण्याची मुस्कानची विनंती

कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या सुमारे सात वर्षांच्या मोठ्या मुलीला भेटण्याची विनंती करत आहे. मात्र, अद्याप मुलीला तिची भेट घडवून आणण्यात आलेली नाही. मुस्कान गेल्या तीन दिवसांपासून कारागृहात पूजा करत होती. दोघांच्याही वर्तनात बदल दिसून आला आहे. रात्री आणि सकाळचे जेवण त्यांनी कमी केले असून, त्यांना नीट झोपही लागत नसल्याचे सांगण्यात आले. साहिलने सहकैद्यांशी बोलणेही बंद केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

छातीत चाकू भोसकून सौरभची हत्या

सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होता. तो २४ फेब्रुवारी २०२५ रोजी लंडनहून मेरठला परतला होता. ३ मार्च २०२५ रोजी मुस्कानने साहिलच्या मदतीने सौरभच्या जेवणात औषध मिसळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर बेडरूममध्ये झोपलेल्या सौरभच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवण्यात आले. त्यावर सिमेंटचे मिश्रण टाकून मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी मुस्कान शिमला-मनालीला गेल्याचे तपासात समोर आले होते.

हेही वाचा: Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

संवेदनशील प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही दोषींना जिल्हा न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना फॉरेन्सिक अहवालासह विविध मुद्द्यांवर अंतिम विचारणा केली. कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, दोघांना स्वतंत्रपणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी विविध पुरावे आणि अहवालांबाबत त्यांच्याशी संवाद साधला. दोघांनीही आपली बाजू मांडली. सुनावणी थोडक्यात झाली असून, शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर बोलावले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Meerut blue drum murder case muskan sahil convicted sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • murder case news
  • Murder News

संबंधित बातम्या

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत
1

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
2

Crime News: नशेविरोधात आवाज उठवणं पडलं महागात; फेसबुक LIVEमध्येच कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा
3

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत
4

Pune Crime News: वाद दोन जणांचा, बळी तिसऱ्याचा; तीन लाखांच्या वादात तरुणाचा रक्तरंजित अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.