'रिल स्टार'रोहिणी पाराध्ये प्रकरणी मोठा ट्विस्ट; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी पराध्ये यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी विविध आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि संबंधित आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश पारध्ये हा मागील वर्षभरापासून रोहिणीला तिच्या इच्छेविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडत होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तसेच रोहिणीला शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.या सततच्या छळाला कंटाळून रोहिणीने हॉटेलमधील राहत्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी रोहिणीचे वडील बाबू गिरजप्पा शिवशरण (रा. अर्धनारी ता.मंगळवेढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश पारखे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 115(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रोहिणी आणि तिचा नवरा निलेश पाराध्ये या जोडीने मिळून हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं होतं. ढवरा मटन थाळी ही त्यांची स्पेशालिटी होती. रोहिणी स्वत: हॉटेलचं किचनचं काम पाहत होती. याच हॉटेलमध्ये ती रिल्स बनवून गही अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. पण, कुणाला ठावून असं काही घडेल. २६ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रोहिणीने स्वतःच्या स्वयंपाक खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. रोहिणीनं गळफास घेतल्याचं लक्षात आल्यावर तिला तातडीने मंगळवेढा इथं नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा शेवट झाला.






