संग्रहित फोटो
संबंधित दुकानात बंदी घातलेले गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारी सुमारे २.१५ वाजता संयुक्त पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात विविध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले. पथकाने तात्काळ ४७,२९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दुकानातील गणेश बाळू भंडलकर व निलेश वसंत पवार (दोन्ही रा. लोणी गाव) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त केलेला माल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०६ डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बा. औ. शिंदे (गुप्तवार्ता) व सुप्रिया जगताप यांनी सहभाग घेतला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले, भविष्यातही अशाच प्रभावी कारवाया करून कदमवाकवस्ती व लोणी काळभोर हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






