Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: नालासोपारा-विरार हादरले! पतीने दुसऱ्या पत्नीसह पहिल्या पत्नीला मारहाण करत केली हत्या

विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात 30 वर्षीय आरतीची पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीकडून मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली. आरोपी घटनेनंतर फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 02:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पती व दुसऱ्या पत्नीकडून महिलेची मारहाण करून हत्या
  • घटना विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटीतील कल्पवृक्ष कॉम्प्लेक्समध्ये
  • आरोपी पती, दुसरी पत्नी व मुलांसह फरार; पोलिस तपास सुरू
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केळ्याचे समोर आले आहे. पतीने आपल्या दुसऱ्या पत्नीसह मिळून हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना विरार पश्चिमेकडील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल सिटी’ परिसरातील कल्पवृक्ष कॉम्प्लेक्समध्ये घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील महिलेचे नाव आरती असे आहे. ती मूळची बिहारची रहिवासी आहे. पती मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी यांनी संगणमत करून आरतीला बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असताना आरतीचे डोके जोरात भिंतीवर आपटण्यात आले, यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! घराच्या भिंतींवर रक्ताचे शिंतोडे, ड्रममधून वाहणारे रक्त…; ११ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या साईट सुपरवायझरला मुन्नाच्या हालचालींवर संशय आला. सुपरवायझर घटनास्थळी पोहोचला असता, त्याला आरती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. तोपर्यंत आरोपी पती मुन्ना, त्याची दुसरी पत्नी मीरा आणि मुलांसह तिथून पसार झाला होता. हे सर्वजण मूळचे बिहारचे असल्याने ते तिथे पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी मुन्ना हा मूळचा बिहारचा असल्याने तो रेल्वेमार्गे पळून गेल्याचा संशय आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच अर्नाळा-बोळींज पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने जमा केले आहेत. आरोपी मुन्ना आणि मीरा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत

मुंबईच्या वांद्रे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने होणाऱ्या नवऱ्याने प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ६० तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना वांद्रे येथील खेरवाडी येथे घडली.

Buldhana Crime: लग्न, बेरोजगारीचा ताण, गरीब परिस्थितीचा फटका; लग्न न झाल्याने दोन युवकांचे टोकाचे पाऊल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील कल्पवृक्ष कॉम्प्लेक्समध्ये.

  • Que: हत्येमागील संशयित कोण आहेत?

    Ans: मृत महिलेचा पती मुन्ना आणि त्याची दुसरी पत्नी मीरा यांच्यावर संशय आहे.

  • Que: प्रकरण कसे उघडकीस आले?

    Ans: साइट सुपरवायझरला संशय आल्याने तो घटनास्थळी गेला आणि महिलेचा मृतदेह आढळून आला

Web Title: Mumbai crime nalasopara virar shaken husband aided by second wife beats first wife to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
2

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
3

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
4

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.