मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? 'ई-कॉमर्स' ट्विस्ट समोर
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंची आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी संबंधित चाकू ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे पुरावे समोर आले. आरोपीने काही दिवसांपूर्वीच हा चाकू मागवला होता का, की तो यापूर्वीपासून त्याच्याकडे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
MUMBAI LOCAL CRIME : किरकोळ वादातून २१ वर्षीय मयंक लोहारचा बळी; लोकल प्रवासी भयभीत
प्राथमिक तपासानुसार, चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासादरम्यान आरोपी आणि मयंक लोहार यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात आरोपीने धारदार चाकूने मयंकवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मयंकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धावत्या लोकलमध्ये धारदार शस्त्र घेऊन प्रवास कसा करण्यात आला, तसेच अशा वस्तू सहजपणे उपलब्ध होण्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोशनचा परमार नावाचा एक मित्र एका प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. हा मित्र ग्राहकांनी कंपनीकडे परत केलेल्या वस्तू गुपचूप विकत असे. हत्येमध्ये वापरलेला मोठा, धारदार चाकू देखील एका ग्राहकानेच परत केला होता आणि परमारने तो रोशनला दिला होता.
रोशन बारकोड बनवण्याचा व्यवसाय चालवत असे, त्यामुळे त्याला त्याच्या कामासाठी कात्री आणि चाकूंची गरज होती. त्याला त्याच्या कंपनीच्या कामासाठी असे अनेक चाकू खरेदी करायचे होते. म्हणूनच त्याने हा परत केलेला चाकू नमुना म्हणून आपल्या बॅगेत ठेवला होता. पण याच अत्यंत धारदार चाकूने अखेरीस २२ वर्षीय मयंक लोहारचा जीव घेतला आणि एका निष्पाप तरुणाचा जीव संपवला. दरम्यान, जीआरपीकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, पूर्वनियोजन होते का आणि ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून मिळालेल्या शस्त्राचा वापर करण्यामागे कोणते उद्दिष्ट होते, याचा सर्वंकष तपास सुरू आहे.






